Crime News : अवैध गॅस व डिझेल चोरीचा पर्दाफाश; धुळे जिल्ह्यात १.५६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Illegal theft of gas and diesel on the Gujarat-Dhule highway : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने दोन दिवस गुप्त पाळत ठेवून गुजरात-धुळे महामार्गावर अवैधरीत्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच अन्य साहित्य असा सुमारे १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



या प्रकरणी तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ, सुरत-धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा ढाब्याच्या मागे व पार्श्वनाथ ढाब्यालगत करण्यात आली. राज्य दक्षता पथकाने दोन दिवस पाळत ठेवून गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असताना छापा टाकला.



कारवाईदरम्यान गुजरातहून जळगावकडे जाणारा जीजे-०६ एझेड-४४३० क्रमांकाचा एलपीजी गॅस टँकर, त्यातील १७.४२ मेट्रिक टन एलपीजी गॅस, जीजे-१२ बीझेड-७९९९ क्रमांकाचा डिझेल टँकर, त्यातील ३५ किलोलीटर डिझेल, तसेच बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, १३० व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजनकाटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एलपीजी गॅस टँकर व गॅस साठा, डिझेल टँकर व डिझेल साठा, बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे नॉझल, वजनकाटे आणि इतर साहित्याचा समावेश आहे.



ही कारवाई राज्य दक्षता पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांनी केली. अवैध इंधन व गॅस चोरीविरोधातील ही अलीकडील काळातील मोठी कारवाई मानली जात असून, संबंधित आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''