Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार




बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर मित्रांसोबत फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या तिघांचा प्रवास काही क्षणांतच दुर्घटनेत बदलला.



मृतांमध्ये योगेश नेगी (२६) आणि रेबेका जेकब (२४) यांचा समावेश आहे. तर अंगद नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. (BMW Accident Badlapur)


माहितीनुसार, योगेशचा वाढदिवस असल्याने मित्रांनी बदलापूरमध्ये एकत्र येऊन पार्टी केली होती. त्यानंतर तिघेही आलिशान BMW कारमधून निर्माणाधीन मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवे परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास कार टिटवाळा-बदलापूर मार्गावर एरंजाड परिसरातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.


भरधाव वेगातील कार थेट दुभाजकावर आदळली. धडकेनंतर वाहन अनेक वेळा पलटी झाले आणि रस्त्यावर दूरपर्यंत घसरत गेले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांनी आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले, मात्र योगेश आणि रेबेका यांचा जागीच मृत्यू झाला होता.



प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी कार अतिशय वेगाने धावत होती. अपघातानंतर मोठा आवाज झाला आणि वाहनाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.


घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग, चालकाची अवस्था आणि इतर तांत्रिक बाबींची चौकशी सुरू आहे. जखमी तरुणाचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


या दुर्घटनेमुळे वेगमर्यादेचे पालन आणि सुरक्षित वाहनचालकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Geyser Electricity Saving Tips: गीझरमुळे वाढतंय वीजबिल? तापमान आणि वापराच्या या सवयी बदला

Geyser Electricity Saving Tips: थंडीच्या दिवसांत गरम पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं कठीण असतं. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट