TET Paper Leaked : शिक्षक भरतीला पुन्हा धक्का! परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक, उद्याची परीक्षा तात्पुरती स्थगित

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर उद्या म्हणजेच रविवार २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा तातडीने स्थगित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे २ लाख २६ हजार उमेदवारांवर थेट परिणाम झाला असून ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (TET Paper Leaked)



नेमका प्रकार काय ?


प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बाहेर गेल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. त्यानंतर शिक्षण विभाग आणि संबंधित तपास यंत्रणांनी तातडीने हालचाल करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. पेपरफुटीची शक्यता लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. (TET Paper Leaked)



२ लाख २६ हजार शिक्षक देणार होते टीईटीचा पेपर :


या परीक्षेसाठी राज्यभरातील २.२६ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची आणि निवासाची व्यवस्था करून बसले होते. मात्र, अचानक परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, पेपरफुटीमागील नेमके कारण, त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे आणि प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने बाहेर आली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (TET Paper Leaked)


शिक्षण विभागाकडून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून उमेदवारांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (TET Paper Leaked)

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही