Bhiwandi Fire : मुंबई-नाशिक महामार्गावर आगीचा महाभडका! टायर-लाकडी गोदामासह अनेक दुकानं आगीच्या विळख्यात

भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोदामात मोठ्या प्रमाणात टायर आणि लाकडी साहित्य साठवलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीने शेजारील काही दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतल्याने नुकसान वाढले आहे. (Bhiwandi Fire)


मुंबई-नाशिक महामार्गालगत निम्बोळी गावाजवळ असलेल्या या गोदामातून अचानक धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा उसळू लागल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (Bhiwandi Fire)



गोदामात मोठ्या प्रमाणावर टायर आणि लाकडी पॅलेटचा साठा असल्याने आग वेगाने पसरत असून ती विझविण्याचे काम अत्यंत कठीण ठरत आहे. त्यातच घटनास्थळी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात येत असल्याची माहिती आहे. (Bhiwandi Fire)


या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले असून, वाहतूक व्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम झाला. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, गोदाम आणि शेजारील दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bhiwandi Fire)



दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून या दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Bhiwandi Fire)




Comments
Add Comment

National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी

भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि

दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन निधीतील एक टक्का राखीव; जलसंपदा विभागात 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध

मुंबई : दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण, जलसंपदा विभागाची प्रशासकीय पुनर्रचना, औद्योगिक विकास आणि ग्रामीण

Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी

दुष्काळी भागांत मत्स्यबीजासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : दुष्काळग्रस्त भागांतील मत्स्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा

Navi Mumbai Airport: चिपी- नवी मुंबई विमानसेवेला 100 टक्के व्यवहार्यता तफावत निधी, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने