Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम राबविण्यात येत असून, मतदारयादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक घराला भेट देणार आहेत. या शासकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी केले आहे.



मोहिमेदरम्यान बीएलओ(BLO) नागरिकांच्या घरी जाऊन विहित नमुन्यातील अर्ज देतील आणि मतदारांची माहिती भरून घेतील. नोकरी अथवा अन्य कारणांमुळे संबंधित मतदार घरी उपस्थित नसल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक आवश्यक माहिती देऊ शकतात तसेच मतदाराच्या वतीने गणना प्रपत्रावर स्वाक्षरीही करू शकतात. त्यामुळे केवळ या प्रक्रियेसाठी नोकरदारांना सुट्टी घेण्याची आवश्यकता भासणार नाही.





प्रशासनाने या मोहिमेत डिजिटल सुविधेलाही प्राधान्य दिले आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ, Voter Helpline किंवा ECINET मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपले नाव तपासता येणार आहे. तसेच मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्याबाबतचे दावे व हरकती ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन दाखल करता येणार आहेत. याशिवाय विविध राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) देखील नागरिकांना या प्रक्रियेत सहकार्य करणार आहेत. नागरिकांनी डिजिटल सुविधांचा लाभ घेत मतदारयादीतील माहिती अचूक ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''