Nashik : मडक्यात सापडला ‘गावठी कट्टा’; पोलिसांच्या तपासानंतर मात्र वेगळंच सत्य समोर

Nashik : सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात एका घराबाहेर ठेवलेल्या रिकाम्या पाण्याच्या मडक्यात बंदुकीसारखी वस्तू आढळल्याने बुधवारी परिसरात एकच खळबळ उडाली. गावठी कट्टा सापडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केल्यानंतर ती वस्तू खरा गावठी कट्टा नसून लाईटर असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.



पपया नर्सरीजवळ (Papaya Nursery) राहणारे रितेश काळे यांच्या घराबाहेर जुने व अडगळीतले साहित्य ठेवण्यात आले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घराची साफसफाई करताना रितेश यांच्या आई रिकामे मडके हलवत होत्या. त्यावेळी मडक्याच्या आत बंदुकीसारखी दिसणारी वस्तू त्यांच्या नजरेस पडली. अनोळखी वस्तू पाहून त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने ही बाब रितेश काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. रितेश यांनी कोणतीही जोखीम न पत्करता जागरूक नागरिकाची भूमिका बजावत सातपूर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) कर्मचारी सागर गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात ती वस्तू गावठी कट्टा नसून सिगरेट पिण्यासाठी वापरले जाणारे लाईटर असल्याचे स्पष्ट झाले.


या घटनेमुळे काही काळ परिसरात निर्माण झालेली भीती दूर झाली असली, तरी संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतः हाताळण्याऐवजी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले आहे. रितेश काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.




निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला आयुक्त मनीषा खत्री यांचा दणका


दरम्यान, दुसरीकडे आज बुधवारी नाशिक मनपाने मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात नाशिक महापालिकेने (Nashik NMC) धडक कारवाई करत वेद मंदिरासमोरील नव्याने बांधण्यात आलेला काँक्रीट रस्ता जेसीबीच्या साहाय्याने फोडला आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) स्वतः उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत असल्याने संबंधित ठेकेदाराला मोठा दणका बसला आहे.


रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आणि प्राथमिक तपासणीत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळाले. आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या निर्देशानुसार सदोष काम स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत संबंधित भागाचा रस्ता तातडीने फोडण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, कारवाईच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, बांधकाम विभागाचे संदेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात पुढील प्रशासकीय कारवाईही केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''