Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी

- औषधांच्या आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बंदरांची एकूण संख्या ४२ वर


नवी दिल्ली : औषध पुरवठा साखळी बळकट करण्याच्या आणि व्यापारास सुलभता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात अलीकडेच उदघाटन झालेल्या नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी दिली आहे. (Navi Mumbai Airport)


औषधे नियम १९४५ च्या नियम ४३अ मधील सुधारणेनुसार, देशात औषधे आयात करता येऊ शकणाऱ्या विमानतळांच्या यादीत आता नवी मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियम १९४० च्या तरतुदींअंतर्गत औषधे तांत्रिक सल्लागार मंडळाशी सल्लामसलत केल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी : https://egazette.gov.in/WriteReadData/2026/274223.pdf) (Navi Mumbai Airport)



या सुधारणेसोबतच औषध नियम १९४५ अंतर्गत औषध आयातीसाठी अधिकृत असलेल्या विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश झाला आहे. यामुळे (रस्ते, रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्गांसह) प्रवेशबंदरांची एकूण संख्या ४२ झाली आहे. या सुधारणेमुळे औषधांशी संबंधित मालवाहतूक अधिक सुलभ होईल, लॉजिस्टिक पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि आयातदारांना औषध आयातीसाठी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. (Navi Mumbai Airport)



हे पाऊल, नियामक चौकट बळकट करणे, व्यापार सुलभता वाढवणे आणि व्यवसाय सुलभतेला चालना देणे, तसेच आयात होणाऱ्या औषधांवर प्रभावी नियामक देखरेख ठेवणे, यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे. (Navi Mumbai Airport)

Comments
Add Comment

BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

Drug Department : औषध विभागाची सात महिन्यांत मोठी कारवाई; 17.73 कोटींचा साठा जप्त, 555 परवाने रद्द

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा