Abhishek Sharma : क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या प्रकरणात न्यायालयाकडून समन्स जारी

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार


नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने, भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माला व्यक्तिमत्व हक्क प्रकरणात दिलासा देताना म्हटले आहे की, त्याच्या प्रतिमेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कथित गैरवापर करणाऱ्या विविध आक्षेपार्ह पोस्ट आणि लिंक्स हटवण्यासाठी अंतरिम आदेश दिला जाईल. न्यायालयाने या प्रकरणात समन्सही जारी केले आहे. आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी अभिषेक शर्माने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी घेत आहे.(Abhishek Sharma)



अभिषेक शर्माच्या वकिलाने यूआरएलच्या माहितीसह एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत, परंतु क्रिकेटपटूविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या दोन पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अजूनही आहेत. वकिलाने असेही सांगितले की, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टने अभिषेक शर्माच्या परवानगीशिवाय त्याच्या प्रतिमेचा व्यावसायिक वापर केला आहे आणि संबंधित मजकूर अद्याप हटवण्यात आलेला नाही.सुनावणीदरम्यान, मेटा आणि ॲमेझॉनने सांगितले की, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अभिषेक शर्माच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या पोस्ट काढून टाकतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.(Abhishek Sharma)



पहिल्या सुनावणीदरम्यान, कथित उल्लंघन करणाऱ्या यूआरएलचे स्क्रीनशॉट्स अभिषेक शर्माच्या याचिकेसोबत जोडलेले नव्हते. त्यामुळे, न्यायालयाने कागदपत्रांची तपासणी केल्याशिवाय कोणताही आदेश देण्यास नकार दिला. त्यानंतर, न्यायालयाने अभिषेकच्या वकिलाला संबंधित स्क्रीनशॉट्ससह एक स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत, अभिषेक शर्माने आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार केलेली कथित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित सामग्री काढून टाकण्याची मागणीही त्याने केली आहे. सध्या, अभिषेक शर्मा भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी आहे.

Comments
Add Comment

Asia Cup Rising Stars 2026: भारताने साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला लोळवलं, तिलक-कुशाग्रची शतकी खेळी

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल

Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!

अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून नमवलं, WTC गुणतालिकेत झाला असा बदल

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका पाकिस्तानने 1-0 ने जिंकली. पहिला

Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून

IND vs NZ 1st Test: केएल राहुल-यशस्वी जयस्वालचं न्यूझीलंडला जोरदार प्रत्युत्तर, 10 वर्षानंतर न्यूझीलंडने पाहिला असा दिवस

[caption id="attachment_1077112" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243