CM Devendra Fadnavis : अजित पवार अपघाती निधन : अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी अपेक्षित, नंतरच तपासाला दिशा मिळेल - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती मृत्यू आणि त्याच्या तपासाविषयी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या संदर्भात दोन प्रकारे तपास सुरु आहे, सीआयडी व एएआयबी तपास करत आहे. जेवढे डाऊनलोड करायचे ते डॉक्युमेंट डाऊनलोड झाले आहे. ब्लॅक बॉक्स मधील सर्व माहिती घेतली आहे. एक प्रिमिलरी रिपोर्ट आला आहे, मात्र सगळा अंतिम रिपोर्ट हा जानेवारीपूर्वी येईल. हा अहवाल आल्यानंतरच सीबीआयच्या तपासाला दिशा मिळणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तसे अहवालासाठी तीन ते चार वर्षे लागतात, हे खरे आहे. पण केंद्र सरकारने विनंती केली आहे, म्हणून दादांच्या पुण्यतिथी आधी हा रिपोर्ट यावा. या रिपोर्टनंतर सीबीआय किंवा सीआयडी यांना धागेदोरे मिळतील. सीआयडी तपासानुसार पायलट सुमित कपूर यांच्यावर शंका होती, त्यांचे सर्व बँक खाते तपासले, पण त्याच संशयास्पद आढळले नाही.



फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुढे बोलताना म्हणाले की, ‘कुणी शंका घ्यायची गरज नाही, कर्नाटकमध्ये एफआयआर केला. पहिले दोषी कोण हे ठरवावे लागेल. एएआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय ते करता येत नाही. भावना महत्त्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही. कोर्टात ते टिकणार नाही, चपराक बसेल. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताला सहा महिने झाले मात्र प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला? याबाबत सर्वांना प्रतिक्षा आहे. अजित पवारांचा अपघात नेमका कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी एएआयबीच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, अजित पवारांच्या (Ajit Pawar) अपघात प्रकरणात एएआयबीचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. या संदर्भात मी माहिती घेतली आहे. आतापर्यंत विमानाचा ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला, गृह मंत्रालयाला आणि मंत्री महोदयांना मी विचारलं की, साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे? त्यांनी मला हे सांगितलं की, साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल. अंतिम रिपोर्ट जो आहे, आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे.

Comments
Add Comment

BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई*

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

Drug Department : औषध विभागाची सात महिन्यांत मोठी कारवाई; 17.73 कोटींचा साठा जप्त, 555 परवाने रद्द

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा