PM Narendra Modi : भारत केवळ बाजारपेठ नाही तर जागतिक विकासाचे लॉन्चपॅड : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत हा केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासाचे "लॉन्चपॅड" बनल्याचे ठामपणे सांगितले. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या उपस्थितीत ऑकलंड येथे दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) संबोधित करताना त्यांनी भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याचे आवाहन केले. मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सेवा आणि कुशल मनुष्यबळाच्या देवाणघेवाणीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, भारत आणि न्यूझीलंड हे लोकशाही, कायद्याचे राज्य, विविधतेचा आदर आणि शाश्वत विकासाच्या समान मूल्यांनी जोडलेले आहेत. या सामायिक मूल्यांच्या बळावर दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल. अवघ्या नऊ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत मुक्त व्यापार करार पूर्ण होणे ही द्विपक्षीय संबंधांतील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्ष २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून सात अब्ज न्यूझीलंड डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची बांधिलकी जाहीर केल्याचे सांगताना मोदी यांनी ही केवळ आर्थिक गुंतवणूक नसून भारताच्या विकास प्रवासातील भागीदारी असल्याचे स्पष्ट केले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून वाढता मध्यमवर्ग, डिजिटल क्रांती, आधुनिक पायाभूत सुविधा, कुशल युवा मनुष्यबळ आणि सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणा यामुळे गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. धोरणात्मक स्थैर्य, राजकीय स्थिरता आणि सातत्यपूर्ण विकासामुळे भारत जागतिक आर्थिक वाढीचे महत्त्वाचे केंद्र बनल्याचे त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi)


उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करताना त्यांनी अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योगासह १४ क्षेत्रांसाठी सुमारे २० अब्ज डॉलरचे प्रोत्साहन उपलब्ध असल्याचे सांगितले. न्यूझीलंडमधील कंपन्यांनी भारताच्या उत्पादन क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. भारतातील विमानतळ, प्रादेशिक हवाई संपर्क, एअर कार्गो आणि पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांदरम्यान कार्गो कॉरिडॉर, थेट हवाई संपर्क आणि संयुक्त पर्यटन पॅकेज विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. (PM Narendra Modi)



फिनटेक क्षेत्रात भारत जगात आघाडीवर असून जगातील जवळपास ५० टक्के रिअल-टाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात, असे मोदी यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले केल्यानंतर देशात ४०० हून अधिक स्पेस स्टार्टअप कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुक्त व्यापार करारामध्ये माओरी समुदायाच्या उद्योगांनाही विशेष स्थान देण्यात आल्याचे सांगून भारत आणि न्यूझीलंड यांनी समावेशक आणि शाश्वत व्यापाराचे नवे मॉडेल विकसित करावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच दोन्ही देशांच्या उद्योगजगताने महत्त्वाकांक्षी व्यापार आराखडा तयार करून किमान पाच संयुक्त प्रकल्पांची निवड करावी आणि त्यासाठी प्रभावी आढावा यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी (PM Narendra Modi) सुचविले.




Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा