10 KG LPG Gas Cylinder : LPG वापरणाऱ्यांनो लक्ष द्या!; आता मिळणार १० किलोचे हलके सिलिंडर, जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

नवी दिल्ली : लहान व्यावसायिक, हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) व्यावसायिक वापरासाठी १० किलो वजनाचे हलके एलपीजी (LPG) सिलिंडर बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयामुळे छोट्या व्यवसायांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. (10 KG LPG Gas Cylinder)



१० किलोच्या सिलिंडरचे स्वरूप :


मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन सिलिंडर हाय-डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE) पासून तयार करण्यात येणार आहेत. हे कंपोझिट सिलिंडर पारंपरिक स्टील सिलिंडरपेक्षा खूपच हलके असल्याने त्यांची वाहतूक आणि वापर अधिक सोपा होईल. गॅस एजन्सी तसेच निवडक विक्री केंद्रांमधून हे सिलिंडर व्यावसायिक एलपीजी दरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. (10 KG LPG Gas Cylinder)



कोणाला होणार सर्वाधिक फायदा?


या नव्या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ लहान व्यावसायिकांना होणार आहे. स्थलांतरित कामगार, भाडेकरू, विद्यार्थी, फूड स्टॉल चालक, कॅफे, छोटे रेस्टॉरंट आणि रस्त्यावरील विक्रेते यांना मोठे १९ किलोचे सिलिंडर साठवण्यासाठी जागेची अडचण भेडसावत असते. अशा ग्राहकांसाठी १० किलोचा हलका सिलिंडर अधिक सोयीचा पर्याय ठरणार आहे. (10 KG LPG Gas Cylinder)


सध्या HPCL चे HP Gas Ojas, इंडियनऑइलचे Indane Xtralite आणि BPCL चे Bharatgas Light या नावाने हलके कंपोझिट सिलिंडर घरगुती ग्राहकांसाठी मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. आता त्याच धर्तीवर व्यावसायिक ग्राहकांसाठीही नवे सिलिंडर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.



सध्या कोणते सिलिंडर उपलब्ध आहेत?


सध्या व्यावसायिक ग्राहकांसाठी १९ किलो, ५ किलो आणि २ किलोचे एलपीजी सिलिंडर उपलब्ध आहेत. मात्र, व्यावसायिक गॅसची किंमत घरगुती गॅसपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.


१४.२ किलो घरगुती LPG सिलिंडर (दिल्ली): ₹९४२
१९ किलो कमर्शियल LPG सिलिंडर: ₹२,९३०
५ किलो कमर्शियल LPG सिलिंडर: ₹८०८.५०
१० किलोच्या कंपोझिट सिलिंडरची वैशिष्ट्ये



नवीन १० किलोचा कंपोझिट सिलिंडर आधुनिक तीन-स्तरीय तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा सिलिंडर पारंपरिक स्टील सिलिंडरपेक्षा सुमारे ५० टक्के हलका आहे. त्यामुळे तो उचलणे, वाहून नेणे आणि उंच मजल्यांवर पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे. याशिवाय, या सिलिंडरची पारदर्शक रचना हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगळ्या गेजशिवाय सिलिंडरमध्ये किती एलपीजी शिल्लक आहे, हे सहज दिसू शकते. यामुळे गॅस संपण्यापूर्वीच रिफिलचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. (10 KG LPG Gas Cylinder)


सरकारी तेल कंपन्यांचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास, व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्या लाखो छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा