Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)



नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून, जनतेच्या पाठिंब्यामुळे भविष्यात ते अव्वल स्थान गाठतील. राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्यांना सातत्याने जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ( CM Devendra Fadnavis)


यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळातील अटल सेतू, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांचा उल्लेख केला. तसेच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.



लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि काँग्रेसवर निशाणा साधत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीत दिलेले दरमहा २१०० रुपयांचे आश्वासनही सरकार पूर्ण करेल, असे ते म्हणाले.


राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका करत, समाजवादी पक्ष आणि काँग्रेससोबतची युती करताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. (Maharashtra Politics)


याशिवाय, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केल्याचा उल्लेख करत, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या एकटा पडत असल्याचाही दावा नवनाथ बन यांनी केला. (Politics)

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी