Ajit Pawar : अजित पवारांच्या जयंतीदिनी कर्जमाफीची पहिली यादी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकार विभागाकडून प्रक्रिया सुरू


मुंबई : राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनें'तर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २२ जुलै रोजी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिली.



मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न राहील. तर दुसरीकडे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून, आयकर डेटा संदर्भातील माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, राज्यात बोगस बियाणे विक्रीप्रकरणी ११ हजार ५८४ तक्रारींच्या आधारे कारवाईचा धडाका सुरू असून आतापर्यंत ८१ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, महायुती सरकारने यापूर्वीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करून ३६ लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. सन २०१९ च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांसाठी असलेली ५० हजारांची मर्यादा रद्द करून ती २ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी नवीन कर्जाची उचल करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर