Nashik : ८ हजारांहून अधिक नागरिकांनी केली रोपांसाठी नोंदणी, मिशन ग्रीन मान्सून उपक्रमासाठी नाशिककर सरसावले

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’ साठी नाशिककरांनी पुढाकार घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या संकल्पनेतून आणि ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नाशिक शहराला हरित व समृद्ध बनवण्यासाठी नाशिककर सरसावले आहेत. ‘मिशन ग्रीन मान्सून’ (‘Mission Green Monsoon’) मोहीम वेगाने सुरू असून, या मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच पाचव्या रविवारी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून मागवलेल्या ८,७५० देशी रोपांचे प्रभागनिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी ३,५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रभागनिहाय रोपांचे वितरण करण्यात येणार आहे.



क्यूआर कोडद्वारे ८,७५० रोपांची मागणी


पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी विशेष क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ८,७५० रोपांची मागणी नोंदवण्यात आली आहे. या मागणीनुसार पाचव्या टप्प्यात प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी तसेच नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना देशी रोपे पुरवण्यास सुरुवात करण्यात आली. ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांमध्ये ३३ हजारांहून अधिक वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे.



गिरीश महाजन यांचा नागरिकांशी संवाद


या वाटपादरम्यान ओएसडी संदीप जाधव यांच्या फोनद्वारे ना. गिरीश महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधला. नाशिक शहराला निसर्गरम्य बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या प्रभागात मिळालेल्या झाडांची योग्य ठिकाणी लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. वृक्ष वाटप कार्यक्रमात महापौर हिमगौरी आहेर-अडके (Mayor Himgauri Aher-Adke) , नगरसेवक सुधाकर बडगुजर, योगिता हिरे, राहुल गणोरे, श्वेता भंडारी, सीमा पवार, राजेश पंडित, मनोज साठे, चंदू पाटील तसेच मनपा उद्यान विभागातील विवेक भदाणे, प्रशांत परब, सचिन देवरे, श्रीकांत इर्नक, आशुतोष वरपे आणि प्रभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



या ठिकाणी झाले वृक्षारोपण


पहिला टप्पा : सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत एकूण ५,००० वृक्ष लागवडीने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


दुसरा टप्पा : म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) आणि त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात ६,००० वृक्षांची लागवड करण्यात आली.


तिसरा टप्पा : ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दुतर्फा ६,००० देशी वृक्षांचे हरित संरक्षण कवच उभारण्यास सुरुवात झाली.


चौथा टप्पा : दऱ्याई माता परिसरात ५,००० आणि पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात २,००० झाडांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला.


पाचव्या टप्प्याअखेर ८,५०० हून अधिक झाडांचे घरपोच वाटप सुरू करण्यात आले आहे

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''