Whatsapp Chat : WhatsApp चॅटला मिळणार नवा लूक; Iphone यूझर्ससाठी आकर्षक डिझाइनचं अपडेट लवकरच...

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या IPhone यूझर्ससाठी चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी नव्या डिझाइनवर काम करत आहे. सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये (version) चाचणीच्या टप्प्यात असून, लवकरच सर्व iOS यूझर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.



नवीन अपडेटनंतर मेसेज (message) बबलचा आकार अधिक गोल आणि सॉफ्ट दिसणार आहे. त्यामुळे चॅट इंटरफेस अधिक स्वच्छ आणि आधुनिक वाटेल. तसेच फोटो, व्हिडिओ आणि GIFआता जुन्या बॉर्डरयुक्त बबलऐवजी बॉर्डरशिवाय दिसतील. यामुळे मीडिया कंटेंट अधिक उठून दिसेल. नव्या डिझाइनची झलक Appleच्या iMessage आणि Liquid Glass शैलीशी साधर्म्य दाखवणारी असल्याचे सांगितले जात आहे.


याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भातील नव्या फीचर्सवरही काम करत आहे. Two-Step Verification मध्ये ६अंकी PIN ऐवजी पासवर्डचा पर्याय देण्याची तयारी सुरू आहे. तसेच Username फीचरमुळे मोबाईल (mobile)क्रमांक शेअर न करताही इतरांशी संवाद साधणे शक्य होणार आहे. या सर्व बदलांमुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आकर्षक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


कंपनीकडून या अपडेटच्या अधिकृत लॉन्चची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी बीटा टेस्टिंग अंतिम टप्प्यात आले असल्याने येत्या काहीच आठवड्यांत हे फीचर टप्प्याटप्प्याने iPhone यूझर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नव्या डिझाइनसोबतच सुरक्षितता, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुधारण्यावर व्हॉट्सअ‍ॅपचा भर असल्याचे या अपडेट्सवरून (updates) स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''