CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांदरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृह विभागाला दिले. केंद्राने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर गृह विभागाने गुन्हे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.



'नीट' पेपरफुटीच्या निषेधार्थ देशभरात उठलेल्या असंतोषाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. या आंदोलन काळात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर केला होता, तर आंदोलक विद्यार्थ्यांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.



गृह मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या आंदोलनादरम्यान कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही. विद्यार्थ्यांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व किरकोळ प्रकरणांमध्ये आंदोलकांना पूर्ण दिलासा दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''