CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ वेटलीफटिंगमध्ये भारताचा दबाब कायम; माणिपूरच्या बिंद्यारानीने सलग दुसर्‍यांदा जिंकले पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १० पदक जिंकले आहेत. वेटलिफ्टिंग या खेळात भारताने सर्वाधिक सहा पदकं जिंकली आहेत. या क्रीडा स्पर्धेत मणिपूरच्या बिंद्यारानी देवी सोरोखैबाम हिने वेटलिफ्टिंगमधील भारताचा दबदबा कायम राखला आहे. बिंद्यारानीने महिलांच्या ५८ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. तिने एकूण १९९ किलो वजन उचलले आहे. बिंद्यारानीने सलग दुसर्‍यांदा कॉमन वेल्थ गेम्समध्ये देशासाठी पदक जिंकले आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये तिने ५५ किलोच्या गटात रौप्य पदक पटकवले होते.



कॉमन वेल्थगेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ५८ किलो वजनी गटात नायजेरियन रिफियातू हिने स्नँचमध्ये १०३ आणि क्लीन अँण्ड जर्कमध्ये १२६ किलो असे एकूण २२९ किलो विक्रमी वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले आहे. या गटात कॅनडाच्या अ‍ॅनसोफीनने २१५ किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली आहे.






 

आतापर्यंत भारताने कॉमन वेल्थ गेम्स २०२६ :


२ सुवर्णपदके,५ रौप्यपदके,३ कांस्यपदके अशी एकूण १० पदके जिंकली असून, भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आणखी पदकांच्या आशा वाढल्या असून, आगामी स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Commonwealth Games 2026)

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या