LPG Cylinder Price : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा! कमर्शिअल गॅस सिलिंडर 192 रुपयांनी स्वस्त

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. 1 ऑगस्ट 2026 पासून 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किमतीत 192 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शिअल सिलिंडर स्वस्त झाल्याने हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (LPG Cylinder Price)


यापूर्वी जुलै महिन्यातही कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत कमर्शिअल सिलिंडर एकूण 375.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.


नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा कमर्शिअल गॅस सिलिंडर आता 2,738 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,930 रुपये होती. पटनामध्ये सिलिंडरचा दर 3,227 रुपयांवरून 3,018 रुपयांवर आला असून, लखनऊमध्ये हा दर 3,052.50 रुपयांवरून 2,860.50 रुपयांवर आला आहे. (Commercial Gas Cylinder)


मात्र, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या महिन्यातही कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 941.50 रुपये कायम आहे. तर पुणे आणि बंगळुरूमध्ये हा दर 944.50 रुपये इतकाच राहणार आहे. (LPG Price)


दरम्यान, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 1 ऑगस्टपासून महत्त्वाचा बदल लागू झाला आहे. केंद्र सरकारने 300 रुपयांच्या एलपीजी सबसिडीची मर्यादा चालू आर्थिक वर्षात केवळ 4 सिलिंडरपर्यंत ठेवली आहे. याआधी ही मर्यादा 9 आणि नंतर 6 सिलिंडरपर्यंत होती. (Ujjwala Yojana)


यामुळे 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत आधीच 4 सिलिंडर भरून घेतलेल्या उज्ज्वला लाभार्थ्यांना ऑगस्टपासून 300 रुपयांची सबसिडी मिळणार नाही. अशा ग्राहकांना आता इतर ग्राहकांप्रमाणे पूर्ण दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या गॅसवरील खर्चात थेट 300 रुपयांची वाढ होणार आहे. (Domestic LPG)




Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?