Airplane Accident : विमानाचा भीषण अपघात; पर्यटकांचे विमान शेतात कोसळून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू 

 पेरू देशात पर्यटकांचे विमान शेतात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला.


दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात (Peru country) एक अत्यंत भीषण आणि दुःखद विमान दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या नाझका लाईन्स (Nazca Lines) परिसरात पर्यटकांना हवाई सफर घडवणारे एक छोटे विमान अचानक शेतात कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली, ज्यामुळे विमानातील सर्व १३ जणांचा जागीच मृत्यू झाला.


तांत्रिक बिघाडामुळे; उड्डाणानंतर काही वेळातच घडली दुर्घटना :


पेरूच्या नाझका शहरात घडलेल्या या दुर्घटनेबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यात तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाड (Technical glitch) झाल्यामुळे विमानाने आपले नियंत्रण गमावले आणि ते थेट खाली असलेल्या एका शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा मोठा स्फोट होऊन त्याला भीषण आग लागली. या भागामध्ये आदल्या दिवशीच वाळूचे वादळ आले होते, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा भीषण अपघात घडला.


मृत व्यक्तींमध्ये परदेशी पर्यटक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश :


या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विमानामध्ये एकूण ११ परदेशी पर्यटक आणि २ कर्मचाऱ्यांचा (पायलट व को-पायलट) समावेश होता. सरकारी वृत्तसंस्था ॲंडिनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत ११ पर्यटकांमध्ये २ जर्मन, २ स्पॅनिश आणि ७ इटालियन नागरिकांचा समावेश आहे.  नाझका विमानतळाजवळ पोहोचत असताना या विमानाचा संपर्क तुटला होता आणि त्यानंतर ही घटना घडल्याची माहिती पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाने दिली आहे.


१४ वर्षांचा अनुभव असणाऱ्या कंपनीचे विमान :


ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान जवळील एका शहरातून निघाले होते. हे विमान पेरूच्या 'एरोडियाना' या प्रसिद्ध विमान कंपनीद्वारे चालवले जात होते. एअरलाइनच्या अधिकृत माहितीनुसार, ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून 'सेसना ग्रँड कॅराव्हॅन' प्रकारच्या विमानांचा वापर करून नाझका लाईन्सवरून पर्यटकांसाठी हवाई सफारी आयोजित करत आहे. एवढा मोठा अनुभव असतानाही घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक प्रशासनाने या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''