Hemoglobin Foods : शरीरात रक्ताची तीव्र कमतरता? औषधं-गोळ्या विसरा! 'हे' ७ पदार्थ नैसर्गिकरित्या वाढवतील हिमोग्लोबिनचा स्तर

हल्ली अनेकांना सतत थकवा येणे, थोडं काम केल्यावर चक्कर येणे, केस गळणे किंवा अशक्तपणा जाणवण्याची समस्या भेडसावत आहे. ही लक्षणे शरीरातील हिमोग्लोबिन कमी असल्याचे संकेत असू शकतात. हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे प्रथिन असून, ते शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे त्याची पातळी योग्य राखणे आवश्यक आहे. (Hemoglobin)

पोषणतज्ज्ञांच्या मते, केवळ लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढत नाही. त्यासाठी व्हिटॅमिन B12, फोलेट (व्हिटॅमिन B9) आणि व्हिटॅमिन C यांचाही आहारात समावेश असणे गरजेचे आहे. हे पोषक घटक लाल रक्तपेशींची निर्मिती आणि लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात.


हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त 7 पदार्थ



  • अळिवाच्या बिया – लोहाचा उत्तम स्रोत. रात्री भिजवून सकाळी सेवन केल्यास फायदा होतो.

  • शेवग्याची पाने – लोह आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला लोह शोषण्यास मदत होते.

  • काळे तीळ – लोहासोबत कॉपरही मिळते, जे नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत करते.

  • बाजरी – गव्हाऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्यास लोहाचा पुरवठा होतो.

  • मसूर डाळ – लोह आणि फोलेटचा चांगला स्रोत. लिंबाचा रस घालून खाल्ल्यास अधिक लाभ होतो.

  • राजगिरा – ग्लुटेन-फ्री धान्य असून त्यात लोह मुबलक असते.

  • काळे चणे – लोह आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत. मोड आणून किंवा उकडून खाल्ल्यास अधिक फायदेशीर.


Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''