Clove water : स्वयंपाक घरातील हा पदार्थ पाण्यात मिसळा; २१ दिवसात चेहऱ्यावर फरक दिसेल

पाण्यात कोणता पदार्थ मिसळावा आणि हे पाणी प्यायल्याने काय फायदा होईल जाणून घ्या.


तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहात? रोज सकाळी उपाशी पोटी लवंगाचे पाणी नियमित प्यायल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळू शकते.
लवंगमध्ये 'युजेनॉल' नावाचा एक अतिशय शक्तिशाली नैसर्गिक घटक आढळतो. ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. याचा अर्थ असा की, हे थेट त्या बॅक्टेरियाशी लढते, जे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास कारणीभूत असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम्ससारखे हे तुमच्या त्वचेच्या वरच्या थराला हानी पोहोचवत नाही.


Lavang Water :


प्रत्येक भारतीय घरामध्ये आढळणारे लवंग केवळ जेवणाचीच चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर मानले जाते. तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांनी त्रस्त असाल, महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स आणि क्रीम्स वापरूनही बदलत दिसत नसेल तर लवंग तुमच्या खूप कामी येऊ शकते. फक्त तुम्हाला रोज रात्री दोन लवंग पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठून उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. ऐकायला हा खूप साधा सोपा उपाय वाटतो, पण जेव्हा तुम्ही रोज याचा वापर कराल, तेव्हा याचे परिणाम पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल.


21 Days Challenge :


कमीत कमी 21 दिवस सलग लवंगचे पाणी प्या. 21 दिवसांत तुम्हाला स्पष्ट फरक दिसून येईल.
लवंगच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हळूहळू कमी करण्यास मदत करते. नियमितपणे उपाशी पोटी लवंगचे पाणी प्यायलयास त्वचा निरोगी राहील.


निरोगी पोट :


आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आरोग्याचा आणि त्वचेचा थेट संबंध आपल्या पोटाशी असतो. जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसेल किंवा पोटात बिघाड असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. लवंगचे पाणी शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. जेव्हा पोट आतून स्वच्छ राहते, तेव्हा त्वचा आपोआप स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते.


सर्दी-खोकला :


हवामानात बदल होताच सर्दी, ताप, खोकला, कोरडा खोकला, घशात खवखव, या समस्या सर्वात जास्त त्रास देतात. लवंगमध्ये असलेले गुणधर्म सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतात.


दातांचे आरोग्य :


दातदुखी, हिरड्यांमध्ये वेदना, हिरड्यांना सूज येणे अशा समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही लवंगचे पाणी पिऊ शकता.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''