Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा


मुंबई : राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांचा जलद आणि प्रभावी निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष बेंच स्थापन करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात दिले. बेकायदेशीर नोंदी आढळल्यास त्या कायद्यानुसार तातडीने कमी करून पुढील कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.



या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यातील कळवण–सुरगाणा मतदारसंघातील मौजे दरेभणगी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या वक्फ बोर्डाच्या नोंदीच्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार नितीन पवार उपस्थित होते, तर नाशिकचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.



संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून बेकायदेशीर नोंदी असल्यास त्या कमी करण्याची आणि कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. अशा स्वरूपाची प्रकरणे केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागातही आढळून येत असल्याने त्यांचा वेळेत आणि एकसमान पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.



याच बैठकीत कळवण–सुरगाणा मतदारसंघातील मौजे धनेर दिगर, मौजे खर्डे दिगर आणि मौजे पुनद नगर येथील आकारी पडीत जमिनी मूळ मालकांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आकांक्षित तालुका असलेल्या सुरगाणा येथे महसूल प्रशासकीय इमारत उभारण्यास मंजुरी देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

Comments
Add Comment

Premnagarcha Maharaja : मुंबईत पुन्हा घडली तीच दुर्दैवी घटना! कुर्ल्यात बाप्पाच्या आगमनावेळी नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईत गणेशमूर्तीच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलाव परिसरात

Maharashtra Weather : उघडीप की भयंकर संकट? महाराष्ट्रातील हवामानाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट

मुंबई: ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही महाराष्ट्रात पावसाची कमतरता जाणवत आहे. सध्या राज्यात मोठ्या

Eknath Shinde : ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राचा गौरव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तीन पुरस्कार

'हाऊस ऑफ कॉमन्स'मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ

Gram Vikas Department : ग्रामपंचायतींच्या कारभाराला मिळणार गती; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीला मंजुरी

मुंबई : मुदत संपलेल्या, मात्र प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका अद्याप झालेल्या नसलेल्या ग्रामपंचायतींच्या

Mary Kom : ‘मी मेरीला घडवलं' म्हणणाऱ्यांना मेरी कॉमचं सडेतोड उत्तर; म्हणाली...

मुंबई : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू होताच घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ६ सप्टेंबरला

Sports Quota Maharashtra : खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण

- मंत्रिमंडळाची मंजुरी; तीन महिन्यांत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी बंधनकारक मुंबई : प्राविण्यप्राप्त