Kalashtami 2026 : आज मासिक कालाष्टमी; भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

भगवान शिवाचे उग्र स्वरूप मानल्या जाणाऱ्या कालभैरवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मासिक कालाष्टमीचा सण आज, ५ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. प्रत्येक हिंदू चांद्रमासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी येते आणि या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा, उपवास आणि मंत्रजप केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. (Kalabhairav)


यंदा मासिक कालाष्टमीची अष्टमी तिथी ५ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३७ वाजता सुरू झाली असून ६ ऑगस्ट रोजी सकाळी ५:५५ वाजता समाप्त होणार आहे. या दिवशी विशेषतः निशिता काळात कालभैरवाची पूजा करण्याला अधिक महत्त्व दिले जाते.



कालाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून देवघराची स्वच्छता करावी. भगवान शिवाला बेलपत्र, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करून दीप प्रज्वलित करावा. यानंतर कालभैरव चालीसाचे पठण, कालभैरव मंत्रांचा जप आणि आरती केल्यास शुभ फल मिळते, अशी श्रद्धा आहे. शक्य असल्यास कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचाही सल्ला दिला जातो. (Kalashtami 2026)


धार्मिक मान्यतेनुसार, कालभैरव हे भगवान शिवाचे कालस्वरूप असून त्यांना 'वेळेचे अधिपती' मानले जाते. आदित्य पुराणासह विविध धार्मिक ग्रंथांमध्ये कालाष्टमीचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवांनी महाकालेश्वर रूप धारण करून ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छाटले आणि त्यानंतर त्यांच्या या रूपाची 'कालभैरव' म्हणून पूजा सुरू झाली. ( Kalashtami Shubh Muhurat)


भक्तांच्या श्रद्धेनुसार, कालाष्टमीच्या दिवशी श्रद्धाभावाने भगवान कालभैरवाची पूजा केल्यास संकटांपासून संरक्षण मिळते, नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Geyser Electricity Saving Tips: गीझरमुळे वाढतंय वीजबिल? तापमान आणि वापराच्या या सवयी बदला

Geyser Electricity Saving Tips: थंडीच्या दिवसांत गरम पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं कठीण असतं. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट