Water Intake : मानवी शरीराला किती पाणी आवश्यक असते; रोज किती पाणी प्यावे? सविस्तर माहिती

तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय दुष्परिणाम होतात? पाणी कधी आणि कसे प्यावे?


सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या:

मानवी शरीराचा सुमारे साठ टक्के भाग पाण्यानं बनलेला असतो. पाण्यामुळे रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुरळीत राहते. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर थकवा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.


साधारणपणे, दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी पिणं पुरेसं मानलं जातं. कष्टाचं काम किंवा उन्हात वावरल्यामुळे, खूप घाम येत असेल तर हे प्रमाण तीन ते चार लीटरपर्यंत वाढू शकतं. मात्र, एका दिवसात सहा ते आठ लीटर किंवा त्याहून अधिक पाणी पिणं हानिकारक ठरू शकतं.


अतिप्रमाणात पाणी प्यायलात, तर शरीरातील सोडियमसारखी खनिजं विरळ होतात. याचा परिणाम मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर होऊ शकतो. या स्थितीला 'वॉटर टॉक्सिसिटी' किंवा 'वॉटर पॉयझनिंग' असंही म्हटलं जातं. यात गोंधळल्यासारखं वाटणं, चक्कर येणं आणि बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात.



खूप कमी पाणी प्यायलानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्याला डिहायड्रेशन म्हणतात. याचे परिणाम सर्वप्रथम त्वचा, लघवी आणि ऊर्जेच्या पातळीवर दिसून येतात. त्वचा कोरडी पडणं, लवकर थकवा जाणवणं आणि सतत डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.


पाणी कधी आणि कसे प्यावे?




  • सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर असतं.

  • जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यायल्यानं पचनक्रियेस मदत होते.

  • जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.

  • दिवसभरात गरजेनुसार थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पिणं चांगलं असतं.




पाण्याची गरज ही त्या व्यक्तीचे वय, शारीरिक हालचालींचे प्रमाण, ऋतू आणि शरीराची रचना यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे, सर्वांसाठीच पाण्याची एखादी निश्चित मात्रा लागू करता येत नाही; तरीही, 2.5 ते 3 लीटर हे प्रमाण सरासरी निकष म्हणून मानलं जाऊ शकतं.

Comments
Add Comment

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाकडून IRCTC अंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची

Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video

मुंबई: कायमच सुसाट धावणाऱ्या कोस्टल रोडवर काही वेळापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही

Thane Metro Train Trial Run: ठाणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; पहिला टप्पा केव्हापासून सुरू होणार?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. ठाणे शहरातील पहिल्या मेट्रो सेवेचा दुसऱ्यांदा ट्रायल रन घेण्यात

Jalgaon : जाहीर केले 51 हजार, हातात दिले फक्त 5,100 ! जळगावात दहीहंडीवरून गोविंदांचा रस्ता रोको

Jalgaon : दहीहंडी उत्सवात सात थर लावून जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांच्या हातात बक्षिसाच्या नावाखाली अवघे 5 हजार 100

Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद

कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा