BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब


मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्याकडे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पाऊल टाकलेले असतानाच आता सभागृह आणि समित्यांचाही कारभार पेपरलेस करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या २३७ नगरसेवकांना टॅब देण्यात येणार असून या टॅब द्वारे सभागृहातील पटलावरील विषय पत्रिका आणि समित्यांच्या संबंधित सदस्यांना विषय पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टॅबमध्ये एका ऍपद्वारे या प्रस्तावाची सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या एक महिन्यांमध्ये या टॅबचे वाटप करून महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज आधुनिक पध्दतीने पेपरलेस करण्यावर भर दिला जाणार आहे. ( Paperless municipal corporation hall)



मुंबई महापालिकेतील २२७ अधिक १० नामनिर्देशित सदस्यांना सभागृहाच्या पटलावरील मासिक सभेतील विषयांचे प्रस्ताव महापालिका सचिव विभागामार्फत उपलब्ध करून दिला जातो. तसेच स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती तसेच १७ प्रभाग समिती या वैधानिक समित्यांसह स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगरे समिती, महिला व बाल कल्याण समिती, विधी व महसूल समिती, आरोग्य समिती आदी समित्यांच्या पटलावरील विषयांचे प्रस्ताव संबंधित सदस्यांना महापालिका सचिव विभागामार्फत पाठवले जातात. हे प्रस्ताव त्यांच्या घरी पाठवले जातात आणि यासाठी महापालिका सचिव विभागामार्फत याचा बटवडा केला जातो. ( Paperless Administration)


परंतु, आता या महापालिका आणि समित्यांमधील नगरसेवकांच्या कामकाज अधिक पारदर्शक करतानाच पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी २३७ नगरसेवकांसाठी टॅब खरेदी करण्याची प्रक्रिया आयटी विभागाच्या माध्यमातून सुरु आहे. हे सर्व टॅब ऍपल कंपनीचे असतील आणि १३ इंची या टॅबमध्ये एका ऍपद्वारे पटलावरील प्रस्तावांचे विषय त्यांना पाहता येणार आहे. यामध्ये टॅबची मेमरी फुल होणार नसून ऍप द्वारेच प्रस्ताव पाहता आणि वाचता येणार आहे. यामुळे टॅबच्या खरेदीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्यात हे टॅब उपलब्ध झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण संबंधित नगरसेवकांना दिले जाणार आहे. तसेच हे प्रस्ताव वाचण्यासाठी त्याची फाईल उघडण्यासाठी कोड क्रमांक दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News)

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या