मुंबई: कल्याणमधील अवघ्या चार महिन्यांच्या बाळावर मुंबईच्या परळमधील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात दुर्मिळ स्वरयंत्राच्या शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. दूध पिताना ते फुफ्फुसात जात असल्यामुळे या बाळाला न्यूमोनियाचा त्रास झाला होता. डॉक्टरांनी तोंडातून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे बाळाला मानेवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची तसेच श्वास घेण्यासाठी ट्रॅकिओस्टॉमी करण्याची गरज भासली नाही.
मुंबई: मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवण केल्यानंतर तब्बल 70 ते 100 वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा ...
आरव तिवारी असं या चिमुकल्याचं नाव असून तो चार महिन्यांचा आहे. आरवला न्यूमोनिया आणि त्याचा आवाज घोगरा येत असल्यामुळे त्याच्या आई- वडिलांनी त्याला लगेच रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये त्याला ‘टाइप ३ लॅरिंजियल क्लेफ्ट’ जन्मजात हा दुर्मिळ आजार असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्या बाळाच्या अन्ननलिका आणि स्वरयंत्र यांच्यामध्ये असामान्य छिद्र किंवा फट निर्माण होत होती. त्यामुळे दूध पिताना ते श्वासनलिकेत जात होते. वारंवार फुफ्फुसांचे संक्रमण आणि श्वास घेण्यास त्रास होण्याचा धोका निर्माण झाला होता. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाला नाकातून पोटापर्यंत घातलेल्या बारीक नळीच्या माध्यमातून दूध दिले जात होते. त्यामुळे दूध श्वसनमार्गात जाण्यापासून रोखण्यास आणि बाळाला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होत होती.
10 ऑक्टोबर रोजी सल्लागार कान- नाक- घसा शल्यचिकित्सक डॉ. बालगोपाल कुरुप यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने तोंडातून दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपिक कीहोल सर्जरी) शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅमेरा आणि विशेष उपकरणांच्या साहाय्याने स्वरयंत्रावर उपचार करण्यात आले. डॉ. कुरुप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅरिंजियल क्लेफ्ट हा आजार फार दुर्मिळ बालकांमध्ये आढळतो. त्यामध्ये, टाइप 3 प्रकार सुद्धा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. गंभीर आजारावर दुरुस्ती करण्यासाठी मानेवर मोठी शस्त्रक्रिया आणि ट्रॅकिओस्टॉमीवर उपचार केले. मात्र, या बाळाच्या बाबतीत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून सर्व दोष दुर करण्यात आले. या शस्त्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाळाच्या श्वासनलिकेवर शस्त्रक्रिया करताना त्याला एंडोट्रॅकियल ट्यूब न घालता नैसर्गिकरीत्या श्वास देत उपचार करण्यात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरली.
पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील मतेगाव येथे बिबट्याने 65 वर्षीय महिला ...
उपचारावेळी कान- नाक- घसा विभाग आणि बालरोग भूलतज्ज्ञांच्या पथकात अत्यंत समन्वय आवश्यक होता. भारतात मोजक्याच रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. वाडिया रुग्णालयातील ही अशा प्रकारची दुसरी शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. कुरुप यांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रियेनंतर बाळाला एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर बाळाला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. विशेष म्हणजे, बाळाने पुन्हा तोंडाने दूध पिण्यास सुरुवात केली आणि दूध पिताना खोकल्याचा त्रासही झाला नाही. एका आठवड्याच्या आत बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. लहान मुलांना वारंवार न्यूमोनिया होणे, दूध पिताना सतत खोकला येणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी बालरोग फुफ्फुसतज्ज्ञ किंवा कान- नाक- घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
बाळाच्या पालकांनीही वाडिया रूग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. बाळ आता खोकल्याशिवाय दूध पीत असून आनंदाने खेळत असल्याचे पाहून मोठा दिलासा मिळाल्याची भावना बाळाच्या पालकांनी व्यक्त केली. दुर्मिळ जन्मजात विकारावर आधुनिक आणि कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वी उपचार करून वाडिया बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.