Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा करण्याची धार्मिक परंपरा मनाली जाते. आपल्या घरातील आणि आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचे स्वागत करणारा सण असे या सणाचे माहात्म्य सांगितले जाते. यंदा दीप अमावस्या बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी साजरी करण्यात येईल. (Ashadha Amavasya 2026)




दीप अमावस्येच्या पूजेची प्रक्रिया कशी असते?


दीप अमावस्येच्या दिवशी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी, घरातील सर्व दिवे, समयी, लामणदिवे, ई. स्वच्छ धुवून, वाळवून घ्यावेत. घरातील दिवे स्वच्छ धुवून घेणे; म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे असे समजले जाते. शिवाय यामुळे घरात लक्ष्मीचे व आनंदाचेही स्वागत होते असे म्हटले जाते. या पूजेकरता हळद, कुंकू, अक्षता, सुगंधी फुले, फुलांचे गजरे, रेशमी वस्त्रमाळ आणि गूळ घालून तयार केलेले कणकेचे गोड दिवे तयार करून घ्यावे. दीप अमावस्येच्या पूजेत कणकेचे दिवे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात, ज्यामुळे पूजेचे फळ द्विगुणीत होते. (Deep Amavsya)


पूजेसाठी स्वच्छ चौरंगावर किंवा पाटावर तांदळाची रास पसरवून घ्यावी. त्यावर पूजेकरिता धुवून वाळवलेले दिवे एका ओळीत व्यवस्थित मांडून घ्यावेत. नंतर या दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून वाती ठेवाव्यात आणि दिवे प्रज्वलित करून घ्यावेत.(Deep Amavsya)


पूजेच्या सुरुवातीला श्रीगणेशाचे स्मरण करून गणपतीची पूजा करावी. त्यानंतर सर्व दिव्यांना हळद-कुंकू वाहावे, अक्षता आणि सुगंधी फुले अर्पण करावीत. प्रत्येक दिव्याला हळदीचे कंकू लावून आणि वस्त्रमाळ अर्पण करून त्यांचे मनोभावे पूजन करावे. पूजेनंतर सर्व दिव्यांना फुलोरा, लाह्या, आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर गुळ घालून तयार केलेल्या कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांचे औक्षण करून घ्यावे. दीप अमावस्येचे मनोभावे पूजन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी, भरभराट आणि मांगल्य सदा नांदत रहातं.(Deep Amavsya)



सूर्यग्रहणाचा दीप अमावस्येच्या पूजेवर काही परिणाम होणार का?


दीप अमावस्येदरम्यान येणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दीप अमावस्येच्या पूजेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी मनात कोणतीही शंका न ठेवता आनंदाने व मनोभावे दीप अमावस्या साजरी करावी. (Solar Eclipse)

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''