Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या रुंदीकरण कामाची मंगळवारी सकाळी पाहणी करण्यात आली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी तसेच, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली. या वेळी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची भौतिक प्रगती, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. तसेच युटिलिटी स्थलांतर, भूसंपादनाशी संबंधित बाबी, कामातील अडथळे आणि काम पूर्ण करण्याचे नियोजित वेळापत्रक याबाबतही माहिती घेण्यात आली.



गुणवत्ता निकषांचे पालन करण्याचे निर्देश


आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी करून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक त्या गुणवत्ता चाचण्या नियमितपणे घेऊन त्याची नोंद ठेवावी तसेच तपासणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.



नियोजित वेळापत्रकानुसार कामाची प्रगती सुनिश्चित करा


रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करावे, कामातील अडथळे तातडीने दूर करावेत आणि नियोजित वेळापत्रकानुसार कामाची प्रगती सुनिश्चित करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. कामाची भौतिक प्रगती, गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही आणि अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी यासह प्रकल्पाची अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते व वाहतूक पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण करण्यावर कुंभमेळा प्राधिकरणाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''