Nashik : सप्तशृंगगड घाटातील धबधब्यांजवळ संरक्षण कठड्याची मागणी

Nashik : पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगगड घाटातील (Saptashrungagad Ghat) भवरी धबधब्यांजवळ (Bhavari Waterfalls) अपघाताची शक्यता वाढली आहे. यापुर्वी छोटे, मोठे अपघात होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) तातडीने संरक्षण कठडे आणि लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांमधून होत आहे.




संरक्षण भिंत नसल्याने खोल दरीत पडण्याचा धोका


सप्तशृंगगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. घाट रस्त्यावर ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि हिरवेगार जंगल पाहण्यासाठी भाविक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय अनेक भाविक धबधब्याच्या प्रवाहात उतरून फोटो काढतात व आंघोळ करतात. रस्ता अरुंद आणि निसरडा असल्याने घसरणे तसेच वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने खोल दरीत पडण्याचाही धोका आहे.




प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी


स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही येथे किरकोळ अपघात झाले होते. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. धबधबे असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लोखंडी संरक्षण जाळी, कठडे आणि सूचना फलक बसवावेत. तसेच वाहनतळासाठी जागा निश्चित करून वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




...अन्यथा मोठी दुर्घटना


सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी लोखंडी संरक्षण जाळी, कठडे आणि सूचना फलक बसवावेत. तसेच वाहनतळाची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त वाढवावा. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.- लक्ष्मीकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड

Comments
Add Comment

Mumbai Crime : मालाडमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; 19 जणांवर गुन्हा, 22 जणांची 14.83 लाखांची फसवणूक

मुंबई :  मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात बांगूर नगर पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून 19 जणांविरोधात गुन्हा

PM Modi Teachers Day Speech : शिक्षक दिनानिमित्त PM मोदींचा शिक्षकांशी मनमोकळा संवाद; 'स्क्रीन टाईम' आणि ड्रग्जच्या वाढत्या धोक्यावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी

Difference Between Guru Purnima and Teachers Day : गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन यांच्यातील मुख्य फरक अन् महत्त्व काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात, उत्तम संस्कार करण्यात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देण्यात

Pune News : पुण्यात दहीहंडीचा सांगाडा काढताना भीषण अपघात; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढताना भीषण अपघात झाला.

Nashik Mhada Scam : नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यात मोठी कारवाई ! १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित तर मनपातील १५ जणांवर कारवाईची टांगती तलवार

Nashik Mhada Scam : नाशिकमधील बहुचर्चित सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. या

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून, मुंबईतही ठिकठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे