Tuesday, September 1, 2026

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवा दलाच्या एकूण १०५७ जणांना पदके जाहीर झाली आहेत. काहींना शौर्य पदके तर अनेकांना सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शौर्य पदक (जीएम) हे जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करताना, किंवा गुन्हा रोखताना किंवा गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेले उल्लेखनीय धैर्य, यासाठी प्रदान केले जाते. यंदा एकूण ३०१ शौर्य पदके (जीएम) जाहीर झाली आहेत. यात २७२ पोलिसांना आणि २९ अग्निशमन दलाच्या जवानांना जाहीर झाली आहेत. यंदाच्या ३०१ शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक, १९७ नक्षलग्रस्त भागातील जवानांना, तर जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील ५१ जवान, ईशान्येकडील राज्यांमधील १२ आणि इतर भागातील ४१ जवानांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रदान केले जात आहेत. यात महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

राष्ट्रपतींचे अती विशिष्ट सेवा पदक (पीएसएम) हे सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते, आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदक (एमएसएम) हे साधनसंपन्नता आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते. यंदा एकूण ९२ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (पीएसएम) जाहीर झाली असून यात पोलीस सेवेतील ८३, अग्निशमन सेवेतील चार, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील तीन आणि सुधारात्मक सेवेतील दोन जणांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एकूण ६६४ पदके (एमएसएम) जाहीर झाली असून यातील ६०६ पोलीस सेवेसाठी, २८ अग्निशमन सेवेसाठी, १८ नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेसाठी आणि १२ सुधारात्मक सेवेसाठी आहेत. महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक (विशिष्ट सेवेसाठी) जाहीर झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी, २ अग्निशमन सेवा कर्मचारी, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

सूची-I पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सूची- II पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सूची- III पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी

१. शौर्य पोलीस सेवा पदक

१. राजू पांडुरंग गवळी - पोलीस उपनिरीक्षक

२. वासुदेव राजम मडावी - पोलीस उपनिरीक्षक

३. दिलीप विठ्ठल आत्राम - नाईक पोलीस शिपाई

४. अजय गोपाळराव मडावी - पोलीस शिपाई

५. गणेश चंद्रम दुब्बुला - पोलीस शिपाई

६. विजय झरू मडावी - पोलीस शिपाई

७. भूपेश मारोतराव जुनमाके - पोलीस शिपाई

८. दलसू कटिया बोगामी - पोलीस शिपाई

९. राजेश शामराव किरांगे - पोलीस शिपाई

१०. मसा बोरा अत्राम - नाईक पोलीस शिपाई

११. यतिश विजयराव देशमुख (भा.पो.से.) - अतिरिक्त पोलीस अधीक्षक

१२. विजय किश्तय्या कोडपे - पोलीस हवालदार

१३. दशरथ रामशहा मडावी - नाईक पोलीस शिपाई

१४. राकेश राजम बेडकी - पोलीस शिपाई

१५. सुधाकर जगन पोर्टे - पोलीस शिपाई

१६. श्रीनिवास समय्या निष्टुरी - पोलीस शिपाई

१७. गणेश हनमंतु गजीवार - पोलीस शिपाई

१८. नितेश प्रभुदास टेंबेकर - पोलीस शिपाई

१९. शिवाजी मेस्सो हिचामी - पोलीस शिपाई

२०. संजय मल्लेश कंकाबंदवार - पोलीस शिपाई

शौर्य अग्निशमन सेवा पदक

१. मनोज विश्वनाथ सावंत - विभागीय अग्निशमन अधिकारी

२. रवींद्र नारायणराव आंबुलेकर - मुख्य अग्निशमन अधिकारी

३. अनिल वसंत परब - उपमुख्य अग्निशमन अधिकारी

४. ईश्वर खंडू कांबळे - वरिष्ठ स्थानक अधिकारी

५. योगेश हिरालाल पवार - स्थानक अधिकारी

६. दत्तात्रय अशोक भोसले - स्थानक अधिकारी

७. महेश आनंद गुदलकर - चालक-परिचालक

८. चिंतामणी शिवाजी खांडेकर - अग्निशामक

९. विकी नागेश सरवदे - अग्निशामक

१०. दर्शन घनश्याम पावडे - अग्निशामक

११. रमेश जीवन कोळी - अग्निशामक

१२. राजेश विष्णू राणे - चालक-परिचालक

१३. हर्षल शंकर कटके - अग्निशामक

३. राष्ट्रपती पदक - विशिष्ट सेवेसाठी

पोलीस सेवा :

१. श्री. शिरीष रवींद्र जैन - अतिरिक्त पोलीस महासंचालक

२. श्री. सुभाष नानासाहेब भुजंग - पोलीस उपअधीक्षक

३. श्री. संजय राजाराम वायचळे - सहायक पोलीस उपनिरीक्षक

सुधारात्मक सेवा:

१. श्री. संजीव सखाराम घाणेकर - सुभेदार

२. श्री. संजय राजारामजी तलवारे - हवालदार

३. गुणवत्तापूर्ण/उत्कृष्ट सेवेसाठी पदक

पोलीस सेवा:

१. श्री. संजय बाजीराव जाधव - उपमहानिरीक्षक

२. श्री. विजयकुमार गोपीनाथ मगर - उपमहानिरीक्षक

३. श्री. दिगंबर पांडुरंग प्रधान - पोलीस अधीक्षक

४. श्री. प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी - अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

५. श्री. भागीरथ शिवाजी देशमुख - अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

६. श्री. प्रवीण विनायक तेजाळे - अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

७. श्री. मनोजकुमार माधवराव यादव - अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

८. श्री. वैभवकुमार जगदेवराव जाधव - पोलीस निरीक्षक

९. श्री. संतोष धनसिंग बर्गे - पोलीस निरीक्षक

१०. श्री. विश्वजीत वसंत कैगडे - पोलीस निरीक्षक

११. श्री. जितेंद्र आनंद कदम - पोलीस निरीक्षक

१२. श्री. जनार्दन यशवंत देसाई - पोलीस उपनिरीक्षक

१३. श्री. अंकुश बाबालाल न्यायनिर्गून - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

१४. श्री. विलास हनुमानराव इंगळे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

१५. श्री. मुजफ्फर अली जाफर अली सय्यद - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

१६. श्री. विनोद प्रभाकर पाटील - पोलीस निरीक्षक

१७. श्री. दिलीप भीमा धुमणे - पोलीस उपनिरीक्षक

१८. श्री. मोहन अण्णासाहेब सौदणे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

१९. श्री. दीपक अनंत ठाकूर - पोलीस उपनिरीक्षक

२०. श्री. संपत मुरलीधर खैरे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२१. श्री. गुलाब प्रभाकर सोनार - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२२. श्री. शेखर दशरथ फार्टले - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२३. श्री. शेरखान दिलावरखान पठाण - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२४. श्री. सुनील निवृत्ती कदम - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२५. श्री. शैलेश चंद्रकांत उपासनी - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२६. श्री. प्रकाश बळीराम कदम - पोलीस उपनिरीक्षक

२७. श्री. चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर - पोलीस उपनिरीक्षक

२८. श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर - पोलीस उपनिरीक्षक

२९. श्री. अरुण पाट्रुजी आत्राम - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३०. श्री. शिवानंद महादेव स्वामी - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३१. श्री. पांडुरंग बाप्पाजी पाटील - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३२. श्री. अनवरअली सय्यदअली सय्यद - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३३. श्री. गणेश शंकर शिंदे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३४. श्री. मनोज गोपाळराव मांगरूळकर - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३५. श्री. प्रदीप वसंतराव चौगांवकर - पोलीस निरीक्षक

३६. श्री. भारत खिमजी गोहिल - हेड कॉन्स्टेबल

३७. श्री. राजकुमार यादवराव जनबंधू - हेड कॉन्स्टेबल

अग्निशमन सेवा:

१. श्री. शंकर उत्तम मिसाळ - मुख्य अग्निशमन अधिकारी

२. श्री. शैलेश महादेव जगताप - अग्निशामक

नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा:

१. श्री. पोपट रामजी सांगदे - वरिष्ठ कर्मचारी अधिकारी

२. श्री. अशोक नामदेव इंगळे - गृहरक्षक

३. श्री. मनोज सदाशिव बरसागडे - गृहरक्षक

सुधारात्मक सेवा:

१. श्री. विकास हनमंतू राजनळवार - अधीक्षक (गट-ब)

२. श्री. महेश लक्ष्मण गडनाईक - हवालदार

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >