Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'मिशन ग्रीन मान्सून' मोहिमेचा ८ वा टप्पा उद्या रविवारी, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार आहे.



'मिशन ग्रीन मान्सून' चा ८ वा टप्पा


या ८ व्या टप्प्यामध्ये नागरिकांनी ऑनलाइन नोंदवलेल्या नवीन मागणीनुसार नाशिक परिसरामध्ये एकूण २,२७५ देशी झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. 'मिशन ग्रीन मान्सून'च्या ८ व्या टप्प्यात नाशिककर नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सर्व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'उन्नत नाशिक अभियान' आणि नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून प्रत्येकाच्या अंगणात आणि परिसरात हरित आच्छादन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


मागील टप्प्यांमध्ये एकलहरे ग्रामपंचायत परिसर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वृक्षारोपण व वाटप मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली होती. त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ऑनलाइन प्राप्त झालेल्या सर्व मागण्यांनुसार नाशिककरांना रोपे सुपूर्द करण्यात येत आहेत.



संगोपन आणि संवर्धनही करावे


दरम्यान, नाशिक शहराला प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या या देशी रोपांचे केवळ रोपण न करता, त्यांचे योग्य संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही पार पाडावी. असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.



आतापर्यंतच्या टप्प्यांतील दमदार वाटचाल , ४२,००० हून अधिक वृक्ष लागवड आणि वाटप


पहिला टप्पा: सातपूर देवराई व शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ५,००० वृक्षारोपण.


दुसरा टप्पा: म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) व त्र्यंबक रोड (ग्रेप काउंटी) येथे ६,००० वृक्ष लागवड.


तिसरा टप्पा: ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दुतर्फा ६,००० देशी वृक्षांचे हरित कवच.


चौथा टप्पा: दऱ्याई माता परिसर (दरी) येथे ५,००० व पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात २,००० वृक्ष लागवड.



पाचवा टप्पा: मागणीनुसार ८,५०० रोपांचे प्रभाग निहाय वाटप.


सहावा टप्पा: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) येथे भावी डॉक्टरांच्या हस्ते ४,५०० प्रत्यक्ष वृक्षारोपण.


सातवा टप्पा: एकलहरे ग्रामपंचायत परिसरात ५००० झाडांचे यशस्वी वृक्षारोपण झाले.


ज्या नागरिकांना अथवा संस्थांना अद्याप रोपांची मागणी नोंदविता आलेली नाही किंवा झाडे मागवायची राहिली असतील, त्यांनी उपलब्ध क्यूआर कोडद्वारे (QR Code) त्वरित आपली ऑनलाइन नोंदणी करून रोपे मागवून घ्यावीत. असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''