Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.



अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान


या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर विविध विभागात नियुक्ती देण्यात आलेल्यांची नावे - शितल प्रतापपुरी गोसावी, साधना रमेश बनकर, शैलेश अशोक दराडे, यश विश्वनाथ कुन्हाडे, कोमल अशोक शिंदे, हेमंत मारुती भाकरे, मयुर परशुराम सायखेडे, सिध्देश मनेश पोतदार, नेहा योगेश गवळी, निरज पुरुषोत्तम परदेशी, मंगेश संजय पाटील, अश्विनी नरेश चौधरी, शुभम संदिप निकम, जोएल राजेश वाघमारे, रोशनी प्रकाश जाधव (विवाह नंतरचे नाव रोशनी बाबाजी शेवाळे), धीरज योगेश खैरणार, पुजा अमोल पवार (विवाहपुर्वीचे नाव पुजा जयवंत गवळी), सनी ज्ञानेश्वर तांदळे, चेतना अजय तायडे, जुनेरा साजीद मनियार, रोहित गोरक्ष जाधव, प्रणव संजय अहिरराव, वैशाली केशव चौधरी, प्रतिक मोहन ओहोळ, युवराज अभिजीत कपाटे, कृष्णा राजेंद्र कदम, अभिजित शरद राऊत, मनोहर शिवाजी गांगुर्डे, योगेश बाळु मुंजे, राहुल राजेश संघानशिव, अजय सदाशिव दोंदे, रामदास दशरथ तिखांडके, ज्योती उत्तम चेबाळे, टिनुराज प्रदिप व्यवहारे, मानसी समाधान आहेर, अजरउद्दीन सलीम शेख, राहुल मधुकर ठाकरे, तेजस्वी निळकंठ यादव, वर्षा सागर पाटील यांना जिल्ह्यातील विविध कार्यालयात नियुक्ती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सध्या नाशिक जिल्ह्यात अनुकंपाचे एकही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.



यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सोबतच याप्रसंगी अनुकंपाधारकांचे कुटुंबिय, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''