Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी चेन्नईच्या फोर्ट सेंट जॉर्ज येथे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या पालकांसह त्रिशा कृष्णन आणि तिची आई यांनीही विशेष हजेरी लावली होती. या सोहळ्यात पिवळ्या रंगाची साडी आणि केसात गजरा माळलेल्या त्रिशाच्या दिलखुलास रूपाने सर्वांचे लक्ष वेधले. जेव्हा मुख्यमंत्री विजय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आले, तेव्हा उपस्थित सर्वांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी विजय समोर येताच त्रिशानी अत्यंत आदराने आणि अभिमानाने त्यांना कडक सॅल्युट केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा दोघांच्या कथित जवळीकीची चर्चा रंगली आहे.



विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पत्नी संगीता यांनी त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याची मोठी बातमी समोर आली होती. ७ ऑगस्ट २०२६ रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हा कायदेशीर वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले. हा सर्व घटनाक्रम घडल्यानंतर मुख्यमंत्री विजय आणि त्रिशा एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात असून, सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय आणि सिनेविश्वात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या