Technology News : 'I'm Not A Robot' वर क्लिक केल्यानंतर Google ला कसं कळतं की तुम्ही माणूस आहात? जाणून घ्या भन्नाट कारण

इंटरनेट वापरताना अनेक वेबसाइटवर 'I'm Not A Robot' म्हणजेच 'मी रोबोट नाही' या पर्यायावर क्लिक करावा लागतो. अनेकांना वाटते की हे फक्त माणूस आणि रोबोट यांच्यात फरक करण्यासाठी असलेले एक साधे बटण आहे. मात्र, त्यामागे बरीच तांत्रिक प्रक्रिया काम करत असते. या सुरक्षाव्यवस्थेला CAPTCHA किंवा reCAPTCHA म्हणतात. इंटरनेटवरील बनावट खाती, स्पॅम आणि स्वयंचलित बॉट्सपासून वेबसाइटचे संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो.


सायबर गुन्हेगार अनेकदा स्वयंचलित बॉट्सचा वापर करून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खाती तयार करतात, तिकिटे बुक करतात किंवा वेबसाइटवर असंख्य रिक्वेस्ट पाठवतात. त्यामुळे वेबसाइटचा सर्व्हरवर मोठा ताण येऊ शकतो. हे रोखण्यासाठी reCAPTCHA वापरले जाते.



अश्या प्रकारे गुगलला कळतं


मात्र केवळ चेकबॉक्सवर क्लिक केल्याने Google ला माणूस आणि बॉटमधील फरक कसा कळतो, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात ही प्रक्रिया केवळ क्लिकवर आधारित नसते. तुम्ही क्लिक करण्यापूर्वी माउस किंवा कर्सर स्क्रीनवर कशा पद्धतीने हलवला, यासह अनेक संकेत प्रणालीकडून तपासले जाऊ शकतात. माणसाचा कर्सर साधारणपणे पूर्णपणे सरळ रेषेत न जाता थोडा हलत किंवा वळत चेकबॉक्सपर्यंत पोहोचतो. स्वयंचलित बॉटमध्ये मात्र हालचाली अधिक कृत्रिम किंवा ठरावीक पद्धतीच्या असू शकतात.


याशिवाय ब्राउझर आणि डिव्हाइसशी संबंधित विविध संकेतांचाही वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, IP पत्ता, डिव्हाइसची माहिती, ब्राउझरशी संबंधित डेटा आणि वापराच्या पद्धती यांचा एकत्रित विचार करून प्रणालीला जोखीम किती आहे, याचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे फक्त 'मी रोबोट नाही' या बॉक्सवर केलेल्या एका क्लिकवर निर्णय घेतला जात नाही.


काही वेळा प्रणालीला वापरकर्ता माणूस आहे की बॉट, याबाबत पुरेशी खात्री होत नाही. अशा वेळी अतिरिक्त CAPTCHA सोडवण्यास सांगितले जाऊ शकते. यात ट्रॅफिक सिग्नल, बस, रस्ते किंवा इतर वस्तू असलेली चित्रे ओळखण्यास सांगितले जाते. या प्रक्रियेमुळे संशयास्पद स्वयंचलित हालचाली रोखण्यास मदत होते.



मुख्यता ही सुरक्षा यंत्रणा आहे


म्हणजेच, 'I'm Not A Robot' हा फक्त एक साधा चेकबॉक्स नसून वेबसाइटवरील बॉट्स आणि गैरवापर रोखण्यासाठी वापरली जाणारी सुरक्षा यंत्रणा आहे. (Cyber Security)

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Geyser Electricity Saving Tips: गीझरमुळे वाढतंय वीजबिल? तापमान आणि वापराच्या या सवयी बदला

Geyser Electricity Saving Tips: थंडीच्या दिवसांत गरम पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं कठीण असतं. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट