Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि क्षमतेवर बसू लागला आहे. सकाळी १० वाजले तरी ऑफिसमधील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहून एका स्थानिक स्टार्टअप संस्थापकाला मोठा धक्का बसला. या समस्येचे मूळ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणात नसून शहरातील भयानक ट्रॅफिकमध्ये असल्याचे सांगत त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



कर्मचाऱ्यांचा दोष नाही, ऑफिसला पोहोचणे हीच मोठी कसरत!



'अप्लाईड एआय स्टुडिओ' (Applied AI Studio) चे संस्थापक बाला पन्नीरसेल्वम यांनी त्यांच्या ऑफिसमधील रिकाम्या बाकांची एक तसवीर लिंक्डइनवर शेअर केली. "समस्या लोकांमध्ये नाही, तर ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जो प्रचंड संघर्ष करावा लागतो, त्यात आहे," असे त्यांनी लिहिले. एचएसआर (HSR) लेआउटसारख्या भागात अवघे ४ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दुचाकीने २० मिनिटे आणि चारचाकीने ३० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमधून वाट काढत ऑफिस गाठेपर्यंत कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेले असतात.



संध्याकाळचा प्रवास आणखीनच त्रासदायक


सकाळच्या थकवणाऱ्या प्रवासापेक्षा संध्याकाळचा परतीचा प्रवास अधिक त्रासदायक ठरतो, असेही पन्नीरसेल्वम यांनी नमूद केले. संध्याकाळी ६ वाजेनंतर ऑफिसमधून निघाल्यास रस्त्यावर दुप्पट वेळ वाया जातो. तर ५ वाजता निघालेले कर्मचारी घरी पोहोचताना इतके गळपटून जातात की त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी किंवा कुटुंबासाठी वेळच उरत नाही. याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर होतो आणि सततच्या थकव्यामुळे कर्मचारी सकाळी ऑफिसला उशिरा पोहोचतात.



१७ किलोमीटरच्या प्रवासाला लागले तब्बल दोन तास


आपला स्वतःचा अनुभव सांगताना पन्नीरसेल्वम म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा पाऊस किंवा रस्ता अडथळा नसतानाही, दुपारी ४ वाजता व्हाईटफिल्ड ते एचएसआर या १७ किलोमीटरच्या अंतरासाठी त्यांना तब्बल दोन तास लागले. "हा ट्रॅफिक या शहरातील लोकांची उत्तम काम करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करत आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चारी बाजूंनी असणाऱ्या वाहतुकीच्या गदारोळात लोकांनी नवीन विचार आणि सर्जनशील काम कसे करावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



सोशल मीडियावर आयटी कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा


पन्नीरसेल्वम यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेक बंगळुरुवासीयांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रस्त्यांवरील प्रचंड गर्दी आणि प्रवासातील अनिश्चितता यामुळे काम सुरू करण्यापूर्वीच अतोनात थकवा येतो, या मुद्द्यावर शेकडो युजर्सनी सहमती दर्शवली आहे. रोजची वाहतूक कोंडी ही आता केवळ वेळेचा अपव्यय राहिलेली नसून मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी मोठी समस्या बनली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी