Navnath Ban : ‘छात्रों की गूंज’ की ‘पैसों की गूंज’? राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर भाजपचे गंभीर आरोप; १० कोटींच्या खर्चाचा दावा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून भाजपने गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काही व्हिडिओ पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केल्याचे सांगितले.


मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन (Navnath Ban) यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘छात्रों की गूंज’ नव्हे, तर ‘पैसों की गूंज’ असल्याची टीका केली. काँग्रेसचे नवे ‘PPP’ मॉडेल म्हणजे ‘Paid Political Program’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.



सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्याचा आरोप :


पुण्यातील कार्यक्रमासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचे व्हिडिओ समोर आल्याचा दावा भाजपने केला. कार्यक्रमाला उपस्थित राहणे, प्रवासाचा खर्च आणि सोशल मीडियावर कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी पैसे देण्यासंदर्भातील पुरावे असल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी (Navnath Ban) केली.



‘३ हजार लोकांसाठी १० कोटींचा खर्च?’


भाजपच्या दाव्यानुसार, सुमारे ३ हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणले जात असेल, तर त्यासाठी अंदाजे ९ ते १० कोटी रुपये खर्च होऊ शकतात. राहुल गांधींच्या राजकीय पुनरागमनासाठी केवळ गर्दी जमवण्यावर एवढा पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला. “हा पैसा कुठून आला? कोण देत आहे? कोणाच्या माध्यमातून दिला जात आहे? या पैशांचा अधिकृत हिशोब काय आहे?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.



फॉरेन फंडिंगपासून कंत्राटांपर्यंत चौकशीची मागणी :


या निधीच्या स्रोताची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. या पैशांचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का, काँग्रेसशासित राज्यांमधील कंत्राटी व्यवहार किंवा कमिशनच्या माध्यमातून पैसा वळवण्यात आला आहे का, तसेच कोणत्या संस्था किंवा व्यक्तींमार्फत निधी वितरित करण्यात आला, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. (Navnath Ban)



काँग्रेसला भाजपचे थेट सवाल :


- पुण्यातील कार्यक्रमासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यामागे नेमके कोण आहे?
- सुमारे ३ हजार लोकांसाठी ९ ते १० कोटी रुपये खर्च होत असतील, तर हा पैसा कुठून आला?
- या निधीचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का?
- कंत्राटी व्यवहार किंवा कमिशनच्या माध्यमातून हा पैसा वळवण्यात आला आहे का?
- राहुल गांधींच्या राजकीय रिलाँचसाठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जात आहेत?


या सर्व प्रश्नांची काँग्रेसने महाराष्ट्रातील जनता आणि देशातील विद्यार्थ्यांसमोर उत्तरे द्यावीत, अशी मागणी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार