Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) मोहिमेच्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक सहकारी संस्था (Sinnar Industrial Cooperative Society) आणि वनप्रस्थ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर औद्योगिक क्षेत्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये वनप्रस्थ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या विविध ठिकाणांची पाहणीही केली.



वनप्रस्थसारख्या संस्था पर्यावरण संवर्धनासाठी दीपस्तंभ


यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, वनप्रस्थसारख्या संस्था पर्यावरण संवर्धनासाठी दीपस्तंभाचे काम करीत असून, पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी उभारलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. उद्योगांचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच बदलते हवामान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ वृक्ष लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वृक्षसंवर्धनाबाबतही व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.


सिन्नर औद्योगिक सहकारी संस्थेने उद्योग आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. औद्योगिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन केल्यामुळे पर्यावरणपूरक औद्योगिक क्षेत्र उभारण्यास मदत होणार आहे. सिन्नरचा हा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न राज्यातील इतर औद्योगिक क्षेत्रांमध्येही राबविण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले. ‘उन्नत नाशिक अभियान’ आणि ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या माध्यमातून नाशिकला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक शहर व जिल्हा बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेला नागरिक, सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि विविध संघटनांनी सक्रिय सहभाग देऊन लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.



गोदेश्वर महादेव मंदिराचीही पाहणी


सिन्नर दौऱ्यादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर येथील प्रसिद्ध गोदेश्वर महादेव मंदिरास भेट देऊन पाहणी केली. मंदिराच्या जीर्णोद्धारासह भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.


यावेळी सिन्नर औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन मनोज चव्हाणके, व्हाईस चेअरमन प्रमोद महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, उदय सांगळे, अजित चव्हाण यांच्यासह सिन्नर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.