Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) केदार जाधव यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची पक्षाच्या क्रीडा प्रकोष्ठ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अधिकृतपणे या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.



नुकतीच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, योगेश सागर, माधवीताई नाईक, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि राजेश पांडे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या विविध प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या, ज्यामध्ये केदार जाधव यांच्या नावाचा विशेष समावेश आहे.



गेल्या वर्षी ८ एप्रिल २०२५ रोजी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने अधिकृतपणे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन आपण पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. आता पक्षात क्रीडा प्रकोष्ठ पदाची धुरा मिळाल्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि खेळाशी संबंधित योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. क्रीडा विश्वात भारताचे नाव उज्ज्वल केल्यानंतर, आता क्रिकेटच्या मैदानावरील हा 'स्टार' खेळाडू राजकारणाच्या पिचवर कशी कामगिरी बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नव्या नियुक्तीमुळे क्रीडा क्षेत्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!

अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून नमवलं, WTC गुणतालिकेत झाला असा बदल

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका पाकिस्तानने 1-0 ने जिंकली. पहिला

Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून

IND vs NZ 1st Test: केएल राहुल-यशस्वी जयस्वालचं न्यूझीलंडला जोरदार प्रत्युत्तर, 10 वर्षानंतर न्यूझीलंडने पाहिला असा दिवस

[caption id="attachment_1077112" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने