Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख ५९ हजार रुपयांची एम.डी. पावडर, एक दुचाकी आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.



पोलिसांना खडकी रोडवर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संशयितयेणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे द्याने रमजानपुरा पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. २४) रात्री अकराच्या सुमारास द्याने येथील गणेश नगर ते असलम हॉटेलकडे जाणाऱ्या खडकी रस्त्यावर छापा टाकला. यावेळी अफसर अनिस कुरेशी (वय २२, रा. अज्जू लसुनवाले यांचे गट, दरेगाव, ता. मालेगाव) हा तरुण दुचाकी (एमएच ४१-एडी ८२२६) सह मिळून आला. पथकाने दुचाकी ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत १ लाख ५९ हजारांची ५३ ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आली. चौकशीदरम्यान संशयित अफसर याने ही पावडर हनिफ शेख गुफरान (रा. कमालपुरा, मालेगाव) याच्या सांगण्यावरून बाळगल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी हनिफ यालाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदा माळी, उपनिरीक्षक नाना चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हवालदार दीपक खैरणार यांनी तक्रार दिली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''