मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही घटना घडली. जलवाहिनी फुटताच वेगाने पाणी वाहू लागले आणि रस्त्याला छोट्या नदीपात्राचे स्वरुप आले. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली. पादचाऱ्यांची पंचाईत झाली. पाणी रस्त्यावर आल्यामुळे स्थानिकांचे हाल झाले. आधीच मुंबईत पाणीकपात सुरू आहे. अशातच जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाहून गेल्यामुळे पाणीकपातीत आणखी वाढ होण्याची चिंता नागरिकांना सतावत आहे. दरम्यान जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे तंत्रज्ञ कामाला लागले. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी नियोजन सुरू झाले. लवकरच जलवाहिनी दुरुस्त करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवू, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.
View this post on Instagram






