Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित संजय गरुड यांचा जामीन अर्ज मागे

Shalarth ID Scam : नाशिकच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयातून अचानक जामीन अर्ज मागे घेतला आहे. जमीन अर्ज अचानकपणे मागे घेतल्याने गरुड यांच्या वकिलांनी कोणती नवीन रणनीती आखली याबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. मात्र आता गरुड यांनी अचानक जामीन अर्ज मागे घेतल्याने तपासाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता बांधली आहे.



ऐन सुनावणीच्या वेळी अर्ज मागे


संजय गरुड यांना २७ जुलै रोजी सोलापूरच्या (Solapur) फार्महाऊसमधून मध्यरात्री अटक झाल्यापासून वैद्यकीय कारणांचे दाखले देत ते नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली असतानाही, गेल्या महिनाभरापासून त्यांचा कारागृहाऐवजी थेट रुग्णालयातच मुक्काम असल्याने पोलिसांच्या आणि वैद्यकीय प्रशासनाच्या भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (दि. २७) न्यायालय आपला निकाल देणार होते. मात्र, ऐन सुनावणीच्या वेळी अर्ज मागे घेतल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.



कारागृहात रवानगी की पोलिसांकडून ताबा


दरम्यान आता गरुड यांच्या प्रकृतीबाबत जिल्हा रुग्णालयाकडून विशेष मेडिकल बोर्डाचा अहवाल मागवून त्यांचा डिस्चार्ज निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. गरुड यांचा जिल्हा रुग्णालयातील आराम संपून आता त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात होणार की पोलीस त्यांना पुन्हा ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गरुड यांच्या या माघारीमुळे पोलीस तपासाचा रोख आक्रमक झाला असून, येत्या काही दिवसांत शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी काही बड्या चेहऱ्याचा समावेश होऊ शकतो.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.