काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४२४७ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागांतून १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींची संख्या २६७ आहे. चीनने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून, ५०० हून अधिक लोकं बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये रसुवा येथील २४, नुवाकोटमधील ९५, धादिंगमधील ५५, गोरखामधील ६२, पूर्व नवलपरासीमधील २०७, पश्चिम नवलपरासीमधील १५१, तनहुँमधील ३७ आणि चितवनमधील २७२ मृतदेहांचा समावेश आहे. यामध्ये अनेक अज्ञात मानवी अवशेषांचाही समावेश आहे. (Nepal Flood)
नेपाळ सरकारच्या विविध यंत्रणांकडे आतापर्यंत ४२४७ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सरकारने सोमवारी सकाळी ११ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे २५, नेपाळी लष्कराचे ४५, सशस्त्र पोलिस दलाचे १३, कस्टम कार्यालयातील १५ आणि इमिग्रेशन कार्यालयातील ३ कर्मचारी आहेत. याशिवाय रसुवा जिल्ह्यातील ८६५ आणि नुवाकोटमधील १,५५८ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित ९३३ जण, मकवानपूरमधील ६५ जण, ५९२ परदेशी नागरिक, परदेशी नागरिकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिक, लँगटांग राष्ट्रीय उद्यानातील ३ जण आणि क्वारंटाईन कार्यालयातील ३ जणांचाही समावेश आहे. (Nepal Flood)
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्राण वाचले. पुराचे पाणी ...
नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १०,४५१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. नेपाळी लष्कराच्या हवाई बचाव मोहिमेद्वारे २५२ परदेशी नागरिक आणि ३३४४ नेपाळी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अहवालानुसार, ३० ऑगस्टपर्यंत जलविद्युत प्रकल्पांमधून १५ चिनी आणि ७ भारतीय नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे.आतापर्यंत हेलिकॉप्टरने ४११ उड्डाणे झाली असून, त्यापैकी ३१ ऑगस्ट रोजी १७ उड्डाणे झाली. (Nepal Flood)
पुरामुळे एकूण २६७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १५६ जणांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. प्रभावित भागांमध्ये सहा सर्जिकल वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. मदत आणि बचावकार्यात एकूण २०,८१९ सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये नेपाळ पोलिसांचे ७,८९४, नेपाळी लष्कराचे ८,७२२ आणि सशस्त्र पोलिस दलाचे ४,२०३ जवान आहेत. प्राधिकरणाने सांगितले की, अज्ञात मृतदेह विविध जिल्ह्यांतील २१ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रभावित भागांमध्ये इंधनाची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी २५ हजार लिटर डिझेल, २१ हजार लिटर पेट्रोल आणि १० हजार लिटर विमान इंधनाचा साठा उपलब्ध आहे. (Nepal Flood)
काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक गावे, रस्ते आणि पूल ...
त्रिशूली जलविद्युत प्रकल्पासह अनेक बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही सातत्याने सुरू आहेत. बोगद्यांच्या आत सुमारे ४ ते ५ फूटपर्यंत चिखल आणि वाहून आलेल्या वस्तूंच्या रुपातील कचरा साचल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव पथकातील एका सदस्याने घटनास्थळी बोगद्याच्या आतील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, मलबा आणि पाण्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अधिकाऱ्यांनी भोटेकोशी-त्रिशूली-नारायणी पुरातील अज्ञात मृतांच्या मृतदेहांवर डीएनए आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केल्यानंतर अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली आहे. शवागारे भरून गेली आहेत आणि नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अजूनही मृतदेह सापडण्याचे सत्र सुरू आहे. ६५० हून अधिक मृतदेहांपैकी आतापर्यंत केवळ २९ मृतदेहांची ओळख पटली आहे. नेपाळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सापडलेल्या सुरुवातीच्या ६६९ मृतदेहांपैकी २११ मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत होते किंवा त्यांचे अवयव अपूर्ण अथवा छिन्नविछिन्न झाले होते. पोलिसांनी सांगितले की, अनेक मृतदेह दोन ते तीन दिवस जाड चिखल आणि पाण्याखाली दबलेले होते. (Nepal Flood)




