Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशांच्या मोहात एका आईने आपल्याच अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बाळाचा सौदा केला. धक्कादायक म्हणजे ७० हजार रुपयांना सौदा करून तिने त्या बाळाचे विकल्याचे उघडकीस आणल्याने एकच खळबळ उडाली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फरजाना चांद शेख असे या प्रकरणातील आरोपी आईचे नाव आहे. फरजानाचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. तिने जुलै महिन्यात या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने पैशांसाठी या निष्पाप बाळाला विकून टाकले. एका प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती फरजानाची प्रसूती कागदपत्रे लागली, ज्यावरून या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला. पोलिसांच्या कसून चौकशीदरम्यान आरोपी फरजाना हिने स्वतः आपले बाळ विकल्याची कबुली दिली आहे.



५ दिवसांची पोलीस कोठडी


पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात फरजानासह एकूण पाच जणांवगुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मानवी तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे थेट तामिळनाडूशी जोडले गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी महिला फरजाना हिच्या वकिलाने पोलिसांच्या या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांवर खोटे दस्तऐवज तयार करून गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या दाव्याचींही पोलिसांकडून सत्यता पडताळून पाहिली जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''