बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात मोदी विविध SCO नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. (PM Modi SCO Summit)
पंतप्रधान मोदी २६व्या SCO शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सदिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून किर्गिस्तानमध्ये पोहोचले आहेत. सोमवारी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी SCO नेत्यांसोबत विविध द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. मंगळवारी मोदी SCO शिखर परिषदेला संबोधित करतील. (PM Modi SCO Summit)
ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. यावेळी ...
पुतीन आणि पेझेश्कियन यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा :
SCO शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा आहे. भारत-रशिया संबंध, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच, पंतप्रधान मोदी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांचीही भेट घेणार आहेत. पश्चिम आशियात यावर्षी युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष लागले आहे. (PM Modi SCO Summit)
बिश्केकमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था :
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बिश्केकमध्ये SCO शिखर परिषदेसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. या परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान किर्गिस्तानच्या राजधानीत दाखल होत आहेत. अधिकृत माहितीनुसार, सुमारे २१ राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान बिश्केकमध्ये येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राजकीय सन्मान ‘ओली दराजाली दोस्तलिक’ देऊन गौरवण्यात आले. उझबेकिस्तानचे ...
मोदींना स्नो लेपर्डचे विशेष गिफ्ट :
किर्गिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना स्नो लेपर्डचे स्टफ्ड टॉय भेट म्हणून देण्यात आले. स्नो लेपर्ड हा किर्गिस्तानचा राष्ट्रीय प्रतीक असून, ६व्या वर्ल्ड नोमॅड गेम्सचे अधिकृत प्रतीकही आहे. (PM Modi SCO Summit)
वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती :
SCO शिखर परिषदेसोबतच पंतप्रधान मोदी ६व्या वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच ते SCO कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेटच्या बैठकीत आणि ‘SCO Plus’ स्वरूपातील बैठकीतही सहभागी होतील. यंदा किर्गिस्तानकडे SCOचे फिरते अध्यक्षपद असून, संघटनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत २०१७ मध्ये SCOचा पूर्ण सदस्य झाला होता. (PM Modi SCO Summit)





