Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त


मुंबई : अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील एक्सपायरी डेट बदलून ते पुन्हा बाजारात विकणारे एक मोठे रॅकेट नवी मुंबईतील तुर्भे येथे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तब्बल ७५ लाखांहून अधिक किमतीचा मुदतबाह्य साठा जप्त केला असून, याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Expired Food Scam)






अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रियल एरियामधील प्लॉट नंबर सी-४४९ वर असलेल्या 'साधना एंटरप्रायझेस' या आस्थापनेवर संयुक्त पथकाने छापा टाकला. जयप्रकाश संचूरीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग यांच्या मालकीच्या या गोदामात नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. येथे विविध नामवंत कंपन्यांचे खाद्यपदार्थ साठवून त्यांची अनधिकृतरीत्या रिपॅकिंग आणि लेबलिंग करण्याचे काम सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने उत्पादनाच्या मूळ पॅकेजिंगवरील तारीख व एक्सपायरी डेट पुसून त्यावर नवीन तारीख छापली जात होती. तसेच काही पदार्थांच्या मूळ घटकांवर आणि न्यूट्रिशिअन माहितीवर नवीन स्टिकर लावून ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे उघडकीस आले. (Expired Food Scam)






अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये संबंधित आस्थापनेविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच, 'साधना एंटरप्रायझेस'चा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. (Expired Food Scam)



मॅगी, चिप्स, कोल्ड्रिंक्स, रेडी-टू-ईट पदार्थांचा समावेश


- या कारवाईदरम्यान प्रशासनाने १० नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित तब्बल ४ हजार ९४२ कार्टन जप्त केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लेज कंपनीचे क्लासिक सॉल्टेड, मॅजिक मसाला, स्पॅनिश टँगी टोमॅटो, सिजलिंग हॉट, लेमन चिली आणि हॉट अँड स्वीट प्रकारच्या बटाटा चिप्सचा समावेश आहे. तसेच कुरकुरे व फन फ्लिप्सचे विविध मसालेदार प्रकारच्या कॉर्न स्नॅक्स, मॅगी नूडल्स, रसोइ ब्रँडचे पनीर टिक्का मसाला, दम आलू, पनीर भुर्जी आणि नॉर मश्रूम सूप यांसारखे इन्स्टंट नूडल्स व रेडी-टू-ईट अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
- याशिवाय हेलमन मयाँगनेज, तसेच थम्स अप व लिमका कॅन ड्रिंक्स या सॉसेस आणि पेयांचाही यात समावेश आहे. मेसर्स युनिक फ्रॅग्रन्स, मेसर्स प्रिस्टाइन वर्ल्डवाईड आणि मेसर्स विपुन दोशी यांच्याकडे कोणतीही कायदेशीर खरेदी पावती किंवा एफएसएसआय परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडील विनालेबल व विनापरवाना असलेला सुमारे ३० हजार ६०० रुपयांचा अतिरिक्त मालही जप्त करण्यात आला आहे. (Expired Food Scam)

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला