मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक वातावरण आणि कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्य कार्यक्रमांना सरसकट परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी मुंबई शिक्षक मंडळाने (मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ) केली आहे. यासंदर्भात मंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांना निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील दहीहंडी आणि गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या उत्सवांमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत सार्वजनिक मनोरंजनातील कार्यक्रमांवर सार्वजनिक सुव्यवस्था आणि शालीनतेच्या दृष्टीने नियमन करण्याची तरतूद आहे.
मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान विश्रांतीची सोय, गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात ...
मुख्य मागण्या:
- पूर्वतपासणी अनिवार्य करा: दहीहंडी व गणेशोत्सवातील अशा नृत्य कार्यक्रमांची गाणी, नृत्यप्रकार, वेशभूषा व सादरीकरणाची पूर्वतपासणी (Scrutiny) करण्यात यावी.
- कडक अटी व शर्ती: आवश्यक Performance Licence व पोलीस परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करू दिले जाऊ नयेत. परवानगी दिल्यास वेळ, वेशभूषा व सादरीकरणाबाबत कडक नियमावली लागू करावी.
- अश्लीलता आढळल्यास परवानगी नाकारावी: सादरीकरण सार्वजनिक शालीनतेशी विसंगत असल्यास त्वरित परवानगी नाकारण्यात यावी आणि उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करावी.
- सिंगल-विंडो प्रणालीत समावेश: BMC द्वारे २०२६ च्या गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन 'सिंगल-विंडो' पोलीस NOC आणि परवानगी प्रक्रियेत या छाननीचा समावेश करावा.
मुंबई शिक्षक मंडळाने स्पष्ट केले आहे की, त्यांचा कोणत्याही कलाकाराच्या वैयक्तिक किंवा कलात्मक स्वातंत्र्याला विरोध नाही, परंतु धार्मिक उत्सवांच्या व्यासपीठाचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन आयोजकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





