Wednesday, September 2, 2026

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली होती. शो संपल्यानंतरही दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या चर्चांवर खुद्द निक्की तांबोळीने स्पष्टीकरण दिले आहे. ( Nikki Tamboli)

काही दिवसांपूर्वी निक्की आणि अरबाज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्याचबरोबर दोघांनीही नाव न घेता एकमेकांवर आरोप केल्यासारख्या पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

नव्या गाण्याचा अल्बम लवकरच...

निक्कीने आता आपल्या इन्स्टाग्रामवर नव्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निक्की आणि अरबाजचा ‘किसी और की गली’ हा अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी दोघांनी ब्रेकअपचा माहोल तयार केल्याचे आता समोर आले आहे. ( Nikki Arbaz Breakup)

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला निक्की आणि अरबाज रोमँटिक कपलच्या भूमिकेत दिसतात. त्यानंतर अरबाजचा अंदाज बदलताना दिसतो. व्हिडिओ शेअर करताना निक्कीने चाहत्यांना उद्देशून म्हटले की, त्यांच्यामुळे चाहते काहीसे गोंधळात पडले होते, मात्र आता अखेर सर्व काही समोर आले आहे.( Arbaz Patel News)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निक्कीने इन्स्टाग्राम स्टोरीवर अफेअर आणि नात्यांबाबत एक सूचक पोस्ट शेअर केली होती. त्याचवेळी अरबाजनेही पार्टनरच्या फसवणुकीबाबत एक पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्टमुळे त्यांच्या नात्यात खरोखरच दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ( Arbaz Patel News)

आता मात्र दोघांचा ब्रेकअप झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक चाहत्यांनी नव्या अल्बमसाठी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काही सोशल मीडिया युजर्सनी ब्रेकअपचा माहोल तयार करून केलेल्या या प्रमोशनवर नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार लोकांच्या भावनांशी खेळ असल्याची टीका केली आहे.( Nikki Tamboli News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >