Jalgaon : जळगावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon : जळगावच्या पारोळा (Parola) तालुक्यातील कोळपिंप्री गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा स्पेशल फोर्सचे पॅरा कमांडो जवान रोहित नारायण पाटील (काटे) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले. देशसेवेत तब्बल नऊ वर्षे समर्पित सेवा बजावलेल्या या वीर जवानाचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कोळपिंप्रीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली. संपूर्ण गाव भावूक झाले होते. रात्री आठ वाजता रोहित काटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.



पूर-बचाव प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी दुर्घटना


हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनीकुंड बॅरेज परिसरात लष्कराचे पूर-बचाव प्रशिक्षण सुरू होते. याच प्रशिक्षणादरम्यान मोटरबोटीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि बोट उलटली. या दुर्घटनेत पॅरा कमांडो जवान रोहित काटे यांना वीरमरण आले. गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी कोळपिंप्री गावात पोहोचताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली.



300 फूट तिरंग्यातून वीर जवानाची अंत्ययात्रा


शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता रोहित काटे यांचे पार्थिव कोळपिंप्री गावात दाखल झाले. पार्थिवाचे दर्शन होताच कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. तब्बल 300 फूट लांबीचा तिरंगा फडकावत आणि देशभक्तीपर गीतांच्या निनादात अंत्ययात्रेला सुरुवात झाली. ‘वीर जवान अमर रहे’, ‘रोहित काटे अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अंत्यसंस्कारस्थळी भारतीय सैन्य दलातील जवानांनी रोहित काटे यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली.रात्री आठ वाजता पुतणे तसेच त्यांचा मुलगा हर्षदीप यांच्या हस्ते जवान रोहित काटे यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.



पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती


जवान रोहित काटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, डीवायएसपी विनायक कोते, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, पारोळ्याचे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, माजी सैनिक निलेश पाटील यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्करी जवानांच्या शिस्तबद्ध सलामीने उपस्थितांचे मन हेलावून गेले.देशसेवेसाठी आयुष्याची नऊ वर्षे समर्पित करणाऱ्या रोहित काटे यांच्या बलिदानाला संपूर्ण कोळपिंप्री गावाने अश्रू नयनांनी अखेरचा सलाम केला.

Comments
Add Comment

Kalyan Latur Expressway : कल्याण ते लातूर आता अवघ्या ४ तासांत; ३५ हजार कोटींच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेला मंजुरी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्याला थेट जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारने

Matheran Suicide News : माथेरानमध्ये दुर्दैवी घटना : अलेक्झांडर पॉईंटवरून २१ वर्षीय तरुणाची १५०० फूट खोल दरीत उडी मारली अन् थेट...

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमधून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ

Jalgaon : स्मार्ट मीटरने वीज बंद झाली, तरी चोरीने वापर सुरूच ! जळगावात 28 जणांवर गुन्हे

Jalgaon : थकीत वीजबिलामुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वापर

Pune News : पुण्यात डीजेचा दणदणाट भोवला! नियम मोडल्याने पोलिसांची कारवाई; साऊंड सिस्टिम जप्त

पुणे :  पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Pune Police : पुणे पोलीस भरतीत स्पोर्ट्स सर्टिफिकेटचा बोगस खेळ उघडकीस; 19 जणांना नोकरी, दोघांना अटक

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेत क्रीडा आरक्षणाचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कुराश आणि

Ramabai Ranvir : मुलीच्या शिक्षणासाठी चप्पल काढून धावल्या; 47 वर्षीय रमाबाईंची जिद्द पाहून देशभरातून मदतीचा हात

बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांची कहाणी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर साधी