Skin Care : बीटाच्या फेसपॅकनं त्वचेला मिळेल पोषण, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक; घरीच बनवा हे फेसपॅक



बीटा मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे त्वचेला आतून पोषण देऊन नैसर्गिक चमक मिळवून देण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग आणि रुक्षपणा कमी करण्यासाठी बीटाचा फेसपॅक अत्यंत प्रभावी ठरतो. त्वचेचा पोत सुधारून ती तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी बीटाचे हे सोपे आणि घरगुती फेसपॅक नक्की वापरून पाहा.





बीटाचा फेसपॅक का वापरावा?


बीटमध्ये betalains, polyphenols आणि vitamin C यांसारखे antioxidant घटक आढळतात. त्यामुळे बीटाचा वापर घरगुती स्किनकेअरमध्ये केला जातो.

 बीट आणि मधाचा फेसपॅक


१ चमचा बीटाचा रस किंवा पेस्ट आणि १ चमचा मध एकत्र करा. हा मिश्रण चेहऱ्यावर लावून साधारण १० ते १५ मिनिटांनी धुवा.

बीट आणि दही


बीटाची पेस्ट आणि १ चमचा साधे दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांनी हलक्या हाताने धुऊन टाका.

बीट आणि अ‍ॅलोव्हेरा


बीटाचा रस आणि अ‍ॅलोव्हेरा जेल एकत्र करून फेसपॅक तयार करू शकता. त्वचेवर लावून १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

 बीट आणि मुलतानी माती


तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीमध्ये थोडी बीटाची पेस्ट मिसळून फेसपॅक तयार करता येतो. पूर्णपणे कोरडे होण्याआधीच चेहरा धुवा.

 वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा


नैसर्गिक घटकांमुळेही काही जणांच्या त्वचेवर irritation किंवा allergy होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य.

आठवड्यातून किती वेळा?


घरगुती फेसपॅक वारंवार वापरण्यापेक्षा आठवड्यातून १ ते २ वेळा वापरून पाहू शकता. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुवून वापर बंद करा. सतत त्वचेची समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Comments
Add Comment

Sachin Tendulkar : ‘माझ्यावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती माझे वडील आहेत’ - सचिन तेंडुलकर

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन

Jalgaon : जळगावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon : जळगावच्या पारोळा (Parola) तालुक्यातील कोळपिंप्री गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा

John Ternus : ॲपलच्या नव्या CEOचं लिंक्डइन प्रोफाइल चर्चेत; CEO झाल्यानंतरही पद अपडेट केलंच नाही

मुंबई : ॲपलचे नवे CEO जॉन टर्नस (John Ternus) सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे, तर लिंक्डइन प्रोफाइलमुळे चर्चेत आले आहेत.

Hanuman Ansh Movie : पाचव्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच

मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत

मनोरंजन विश्वात खळबळ ! प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; हत्येचा संशय, तपास सुरू

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह

Suraj Chavan : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण झाला बाबा, जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बाळाचं आगमन, बाळाचा पहिला Photo समोर

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून लोकप्रिय झालेला सूरज