मुंबई : वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून ५ सप्टेंबर २०२६ रोजी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. उत्सवासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके, नागरिक आणि वाहनांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात येतील.
वाहतूक पोलिसांच्या नियोजनानुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार तात्पुरती ‘नो-पार्किंग’ आणि प्रवेशबंदी लागू केली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना समुद्र सफरीसाठी घेऊन गेलेली ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट समुद्रात अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ ...
जी.एम. भोसले मार्गावर प्रवेशबंदी
वरळी नाका ते कुर्णे चौक या दरम्यान जी.एम. भोसले मार्गाच्या दोन्ही दिशांना वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात येणार आहे. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनतळास बंदी राहणार आहे. मात्र पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
- ‘डिजिटलायझेशन’साठी नियुक्ती; प्रत्येकी ३.४५ लाखांचे मानधन, वर्षाला ८२.८० लाखांचा भार मुंबई (सुहास शेलार) : सरकारी विभागांच्या कामकाजाचे ...
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी वरळी नाका → डॉ. ॲनी बेझंट मार्ग → पोदार जंक्शन → ग्लॅक्सो जंक्शन → पांडुरंग बुधकर मार्ग → कुर्णे चौक असा पर्यायी मार्ग वापरावा.
दक्षिण दिशेच्या वाहतुकीसाठी कुर्णे चौक → पांडुरंग बुधकर मार्ग → ग्लॅक्सो जंक्शन → डॉ. ॲनी बेझंट मार्ग → पोदार जंक्शन → वरळी नाका असा मार्ग उपलब्ध राहणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





